हिंगोणा प्राथमिक आरोग्य केंद्रात २२३० जणांचे लसीकरण

0

हिंगोणा ता यावल | वार्ताहर
हिंगोणा येथे प्राथमिक  आरोग्य केंद्रांमध्ये कोरो ना लसीकरण सुरुवात झाली असुन  आज पर्यंत २२३० लोकांनी कोवीड लस घेतलेली आहे   तसेच परिसरात तिल आमोदा . न्हावी .. बोरखेडा. पिंपरूड .मारूळ चारमळी. रुईखेडा.हंबड्डी. हिंगोणा . यां. गांवाच्या नागरीकांनी लस घेतलेली आहे. प्रा.आ.केंद्र हिंगोणा ता.यावल येथे कोरोना लसीकरण मोहिमेचे नियोजन करण्याकरीता वैद्यकीय अधिकारी डॉ. फिरोज तडवी .  डॉ.अभिषेक ठाकुर यांनी हिंगोणा प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांची बैठक घेतली.   लसीकरणाकरीता वय वर्ष 60 पासुन वरील सर्व नागरीक तसेच 45 ते 59 वयोगटातील कोमॉर्बिड नागरीक अपेक्षित असुन, त्याकरीता माझे कुटुंब माझी जबाबदारी अभियानातील माहितीच्या आधारे सर्व अपेक्षितांची यादि तयार करावी. तसेच रोज सुमारे 200 नागरीकांचे लसीकरण करावयाचे असुन त्याकरीता आवश्यक नोंदणी कक्ष, लसीकरण कक्ष, लसीकरणाच्या नंतर निरीक्षण कक्षात आवश्यक असलेल्या सोयी सुविधांविषयी सुचना करण्यात आल्या.

बैठक संपल्यानंतर सर्व कर्मचाऱ्यांनी लसीकरण मोहिमेचे सर्व नियोजन करत ‘ड्राय रन’ घेण्यात आला. कोरोना लस हि उत्तम असुन याचे कुठलेही दुष्परीनाम आजपर्यंत दिसुन आलेले नाहीत,हिंगोणा गावातील अपेक्षित नागरीकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता जास्तीत नागरीकांनी कोरोनाची लस घ्यावी असे आवाहन वैद्यकीय अधिकारी डॉ. फिरोज. तडवी. डॉ.अभिषेक ठाकुर यांनी केले आहे. सदरील नियोजनाकरीता वैद्यकीय अधिकारी.डॉ. फिरोज डॉ.अभिषेक ठाकुर यांच्यासोबत आरोग्य अधिकारी डॉ.अतुल वायकोळे, डॉ. तृप्ती चौधरी, आरोग्य सहाय्यक अशोक तायडे, कनिष्ठ साहाय्यक पंकज चोपडे, आरोग्य सेविका – कल्पना पाटिल, वैशाली तळेले, कामिनी किनगे, आरोग्य सेवक – विलास महाजन, .त्र्यंबक सावळे, कैलास कोळी, निलिमा महाजन व इतर कर्मचारी व आशा वर्कर उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.