हरणखेड येथील ग्रामपंचायत कर्मचा-यांना धनादेश वाटप

0

बोदवड (बोदवड) :– तालुक्यातील हरणखेड येथील सरपंच सौ.समिता रुपेश गांधी यांनी त्यांचा कार्यकाळ संपण्याआधी ग्रामपंचायत कर्मचारी यांचे त्यांच्या काळातील संपुर्ण पगार धनादेशाव्दारे वाटप केले.त्यात रविंद्र बाबुराव सपकाळे,संजय त्र्यंबक काळसकर,कैलास सुपडा फिरके,यांचा समावेश आहे.या बद्दल ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेचे तालुका अध्यक्ष कुंदन किशोर गायकवाड तसेच कर्मचारी महासंघाचे जिल्हा अध्यक्ष संतोष खरे यांनी ग्रामसेवक श्री.घुगे आणि सरपंच समिता रुपेश गांधी यांचे पती तथा ग्रा.पं.सदस्य रुपेश गांधी,उपसरपंच नरहरी वराडे,सदस्य श्रीकृष्ण रोकडे यांचा सत्कार केला.

यावेळी ग्रा.पं.कर्मचारी,योगेश केने,प्रवीण ठाकरे,नितीन टेकडे, मधुकर जंगले,रतीलाल जाठ,उखा थवर,विलास कोलते आदी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.