तलाठ्याला धक्काबुक्की करत वाळू माफियांनी जप्त वाळूचे डंपर पळवून नेले

0

चाळीसगाव (प्रतिनिधी) :- अवैध वाळू वाहतुक करणारे डंपर महसूल विभागाच्या पथकाने पकडले. हे कारवाईसाठी तहसील कार्यालयात घेऊन जात असतांनाच डंपर चालकाने तलाठी व कोतवाल यांना धक्काबुक्की करून वाळूसह डंपर पळवून नेले. हा प्रकार खरजई रोडवरील हॉटेल संगमच्या पाठीमागे दि.8 रोजी सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास घडला. याप्रकरणी तलाठ्याच्या फिर्यादीवरून डंपरचालकाच्या विरोधात चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.चाळीसगाव तालु्नयात अवैध वाळू वाहतुक करणारे माफिया प्रशासनाला जुमानेसे झाले आहेत.

या घटनेची माहिती अशी की, धरणगाव सजाचे तलाठी विजय खंडू माने व टाकळी प्र.चा. चे कोतवाल छोटु सुकलाल गांगुडे हे तहसीलदार यांच्या आदेशान्वये तहसील कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात अवैधरित्या होणाऱ्या गौण खनिजचे वाहतुकीस आळा घालून कारवाई करण्यासाठी गस्त घालत असतांना दि.8 सप्टेंबर रोजी सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास टाकळी प्र.चा. भागातील खरजई रोडवरील साई संगम हॉटेलच्या पाठीमागे अशोकरत्न बिल्डीकोन बोर्डाजवळ पिवळ्या रंगाचा एमएच.19 झेड.5665 हा डंपर अवैध रित्या वाळू (गौण खनिज) ने भरलेला दिसला. डंपरमध्ये सुमारे 3 ब्रास वाळू होती.तलाठी माने व कोतवाल गांगुर्डे यांनी डंपरचालकास आपली ओळख दिल्यानंतर डंपरचा फोटो काढला. चालकाला नाव विचारले असता त्याने नाव सांगितले नाही. वाळू वाहतुकीचा परवाना आहे काय अशी विचारणा तलाठी माने यांनी डंपरचालकास विचारले असता त्याने तो नसल्याचे सांगितले. माने व कोतवाल यांनी डंपर चालकास डंपर तहसील कार्यालयात घेऊन चल असे सांगितले असता डंपरचालकाने तलाठी विजय माने यांच्याशी अरेरावी करून त्यांना धक्काबुक्की केली व तुला काय करायचे ते करा, मी कोणाला घाबरत नाही असे सांगून वाळूने भरलेला डंपर घेऊन पळू लागला. पथकाने हा डंपर थांबविण्याचा प्रयत्न केला असता डंपरचालकाने त्याच्या ताब्यातील वाळूने भरलेला डंपर भडगाव रोडकडे वेगाने चालवून पळ काढला.

तलाठी माने यांनी हा प्रकार नायब तहसीलदार विशाल सोनवणे यांना सांगितला.त्यानंतर वरिष्ठांच्या आदेशानुसार तलाठी विजय माने यांनी दिलेल्या फिर्यादीवरून  एमएच.19 झेड.5665 या डंपर चालकाने गौण खनिज वाहतुक संबंधी करीत असलेल्या शासकीय कामात अडथळा आणून अरेरावी करून धक्काबुक्की करून डंपर पळवून नेल्याप्रकरणी डंपरचालकाच्या विरोधात चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला भादंवि कलम 353,332,504,506 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वाळू माफियांची दादागिरी वाढली

दरम्यान तालु्नयात गिरणा नदीपात्रातून भर पावसाळ्यातही राजरोसपणे अवैधरित्या वाळूची वाहतुक केली जात आहे. यापूर्वी महसूल विभागाच्या पथकांनी अनेक कारवाया करून देखील माफिया जुमानेसे झाले आहेत. गत महिन्यात 26 ऑगस्ट रोजी रहिपुरी शिवारात महसूल पथक वाळू चोरी रोखण्यासाठी गस्त घालत असतांना तीन ट्रॅ्नटर पकडली होती.यावेळी वाळू माफियांनी महसूल पथकाशी अरेरावी करीत अवैधरित्या वाळू वाहतुक करणारे ट्रॅ्नटर पळवून नेले होते. मात्र पुन्हा काही वेळाने हे ट्रॅ्नटर जागेवर आणून सोडले होते.तालु्नयात वाळू माफियांनी अक्षरशा धुडगूस घातला असून वाळू चोरी रोखणाऱ्या दैनंदिन वाळू गस्ती पथकालाही हे माफिया जुमानत नसल्याचे दिसून येत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.