हतनूर ओव्हरफ्लो झाल्याने पाणी गढुळ

0

सावदा प्रतिनिधी: हतनूर धरणाचे (मुक्ताईसागर) 41 दरवाजे उघङल्यानंतर सावदा शहराला पाणी पुरवठा करणारा फिल्टरेशन प्लॅट वरती गढुळ पाणी येत आहे.गढुळ पाणी स्वच्छ करण्यासाठी दररोज 800 ते 850 किलो सरासरी तुरटी, व ईलेक्ट्रोफोकलंङ पावडर चा वापर करुन पाणी शुद्ध केले जात असून ते पाणी नंतर शहरातील नागरिकांना पुरविले जात आहे.सदरील पाणी शुद्ध करणे साठी मुख्याधिकारी सौरभ जोशी साहेब, इंजिनियर जितेश पाटील व सर्व पाणी पुरवठा कर्मचारी मेहनत घेत आहे.

गटनेते फिरोज खान व नगरसेवक राजेंद्र चौधरी यांनी केली पाहणी

सावदा शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या फिल्टरेशन प्लॅन्ट ठिकाणी समक्ष पहाणी करुन व स्वत: पाणी  पिऊन गटनेता फिरोज खान पठाण,  व राजेंद्र चौधरी नगरसेवक न.पा.सावदा, यांच्यासह पाणी पुरवठा निरीक्षक अवि पाटील, कर्मचारी विकास भंगाळे,पृथ्वी भंगाळे,पंकज बेंङाळे, नरेंद्र राणे यांनी सर्व माहिती जाणून घेतली.

Leave A Reply

Your email address will not be published.