स्वतःचा डाव फसल्याने ललवाणी बावचळले!

0

                               श्रीकांत खटोड यांचा सणसणीत टोला : बोली 8 महिन्यांची, फिरवले 8 वर्ष – महाले
जळगाव, दि.27 –
नुकतेच पत्रकारपरिषद घेवून अजय ललवाणी यांनी आम्ही शासनाचा कोटींचा महसूल बुडविला असा आरोप केला. त्यांचे नाव अजय म्हणजे असे की, पराजय पचनी न पडणारे. अजय ललवाणी यांना पराजय जिव्हारी लागल्याने वैफल्यातून ते बावचळले, असा सणसणीत टोला श्रीश्री इन्फ्रास्ट्रक्चरचे श्रीकांत खटोड यांनी लगावला. ललवाणी यांनी जागा खरेदीसाठी 8 महिन्यांची बोली करून 8 वर्ष फिरवले अशी माहिती, श्रीकांत महाले यांनी दिली.
लोकशाही समुहाच्या कार्यालयाला श्रीकांत खटोड व श्रीकांत महाले यांनी भेट दिली. ललवाणी यांनी शनिवारी पत्रकारपरिषद घेवून मेहरूण तलावाजवळील जागेच्या व्यवहाराबाबत केलेल्या आरोपांवर त्यांनी मनसोक्त भाष्य केले. शासकीय मालकीची मिळकत मनपा हद्दीतील मेहरूण शिवार सर्व्हे नं.424 अ+424 ब, सिटी सर्व्हे नं. 5570 क्षेत्र हेक्टर 3.00 आर या जमिनीचा नियमबाह्य व्यवहार करून खटोड व महाले कुटूंबियांनी शासनाचा 3 कोटी 71 लाखांचा महसूल बुडविल्याचा आरोप अजय ललवाणी यांनी शनिवारी पत्रकारपरिषदेत केला होता. याप्रकरणी श्रीश्री इन्फ्रास्ट्रक्चरचे श्रीकांत खटोड, श्रीराम खटोड, आदित्य खटोड, अक्षय खटोड, समर्थ खटोड, आणि पुरुषोत्तम माधवानी श्रीकांत महाले, संदीप महाले, रवींद्र महाले, मिलिंद महाले यांच्याविरुद्ध दि.25 मे रोजी जिल्हाधिकार्‍यांकडे अ‍ॅड.के.बी. वर्मा यांच्यामार्फत तक्रार दिल्याची माहिती ललवाणी यांनी दिली होती.
याबाबत माहिती देताना श्रीकांत महाले यांनी सांगितले की, माजी सैनिक स्व.विठ्ठल महाले यांच्या नावे असलेली जमीन शासनाने पर्यटन वापरासाठी दिलेली होती. शासनाने दिलेल्या जागेच्या जवळच मनपातर्फे गटारीचे पाणी सोडण्यात येत असल्याने अत्यंत दुर्गंधी पसरली होती. त्याबाबत तक्रार दिली असता लवकरच गटार बांधण्यात येणार असल्याचे कळविण्यात आले परंतु वर्षभर उलटल्यानंतरही त्याठिकाणी गटार बांधण्यात आली नाही. नाईलाजास्तव आम्ही जागा विक्री करण्याचा निर्णय घेतला.
ललवाणीच्या दुकानावर ग्राहकांपेक्षा
आम्ही जास्त फेर्‍या मारल्या
जागेच्या व्यवहारासंदर्भात ललवाणी यांच्याशी आमचे बोलणे झाले होते. सौदापावती केल्यानंतर उर्वरित पैसे आठ महिन्यात देण्याचे त्यांनी लिहून दिले होते. आठ महिने उलटल्यानंतर आम्ही साडेचार वर्ष  त्यांनी व्यवहार पूर्ण केला नाही. वारंवार त्यांच्या दुकानावर कार्यालयात आम्ही फेर्‍या मारल्या. ललवाणी यांच्या आस्थापनांचे सीसीटीव्ही फुटेज तपासले तर ग्राहकांपेक्षा आम्हीच जास्त वेळा दिसू, असे श्रीकांत महाले यांनी सांगितले.
ललवाणी कंपनीचा डाव फसला
अजय ललवाणी  कंपनीला महाले यांच्याकडून सौदा केलेल्या जमिनीचा भाव बाजारात वाढल्यानंतर परस्पर विक्री करण्याचा उद्धेश होता. महालेंकडून कमी भावात जागा घेवून बाजारभाव वाढल्यानंतर त्याची विक्री करायची असा त्यांचा उद्देश होता. पर्यटन उद्देशासाठी आरक्षित असलेल्या जागेवर व्यावसायिक आणि रहिवासाची टाऊनशीप उभारण्याचा ललवाणी यांचा उद्देश होता. परंतु, शासनस्तरावरून तो प्रयत्न सफल होत नसल्याने ते महाले यांची फिरवाफिरव करीत होते, असे खटोड यांनी सांगितले.
पाच तासांत केला व्यवहार पूर्ण
ललवाणींनी लटकवल्यामुळे  फिरवाफिरव होत असल्याचे लक्षात येताच महाले यांनी कंटाळून  आमच्याशी संपर्क साधला. कागदोपत्री सर्व पूर्तता पार पाडल्यानंतर आम्ही केवळ पाच तासात सर्व व्यवहार पार पाडला. गेल्या सात – आठ वर्षात जे त्यांना जमलं नाही, ते आम्ही केवळ काही तासात पार पाडल्याने ललवाणी यांच्यासह इतरांच्या जिव्हारी लागले. त्यामुळे ते वैफल्यग्रस्त झाले.
पर्यटनासाठीच त्या जागेचा उपयोग होणार
शासनाने माजी सैनिक स्व.विठ्ठल महाले यांना ती जागा पर्यटन वापरासाठी दिलेली होती. त्यामध्ये कुकूटपालन, मत्स्यव्यवसायासह इतर 9 विविध बाबींचा समावेश करण्यात आला असल्याची माहिती महाले यांनी दिली. तर त्या जागेवर पर्यटन केंद्र, वॉटरपार्क यासारख्या पर्यटनाच्या विविध बाबी उभारण्याचा मानस असल्याची माहिती खटोड यांनी दिली.
..तर ललवाणी यांनी कान धरून उठबशा काढाव्या
जिल्हाधिकारी यांनी या व्यवहाराबाबत तक्रार केल्यानंतर त्यावर स्थगिती दिली असल्याचे ललवाणी यांनी सांगितले आहे. त्यावर खाटोड यांनी म्हटले आहे कि ललवाणी यांनी सांगितले की जमीन महसूल अधिनियमाच्या कलम ५३ चा खोटा आधार घेऊन जिल्हाधिकारी यांची दिशाभूल केल्याने जिल्हाधिकारी यांनी त्यावर ७ जून पर्यंत स्तगीती दिली आहे. ही सर्व एक प्राथमिक प्रक्रिया आहे. आम्ही केलेला व्यवहार शुध्द आणि पारदर्शक असून लवकरच जिल्हाधिकारी त्यावरील स्थगिती हटवतील, अशी आम्हाला खात्री असल्याचे श्रीकांत खटोड यांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.