स्वच्छ सर्वेक्षण अभियानात भडगाव न.प.ने पटकावला राज्यात ४० वा क्रमांक

0

भडगाव (प्रतिनिधी) : भडगाव नगरपरीषदेने स्वच्छ सर्वेक्षण अभियानात यंदा पश्चिम विभागात 49 वा तर राज्यात 40 क्रमांक पटकावला आहे. गेल्यावर्षी पश्चिम विभागात भडगाव 108 व्या क्रमांकावर होते. नगरपरिषदेने शहरात स्वच्छतेबाबत घेतलेल्या मेहनतीचे हे फळ असल्याच्या प्रतिक्रिया नागरीकांकडुन व्यक्त झाल्या.

आज स्वच्छ सर्वेक्षण अभियानाचे निकाल घोषित करण्यात आले. त्यात भडगाव नगरपरिषदेचा पश्चिम विभागात( महाराष्ट्र, राजस्थान, गुजरात, मध्यप्रदेश, गोवा) 49 रॅक आली आहे. तर राज्यात 40 व्या रॅकवर आहे. यंदा भडगाव नगरपरिषदेने स्वच्छ सर्वेक्षण अभियानात कंबर कसले होते. ओला व सुका कचरा विलगीकरण, जनजागृती, प्लाॅस्टीक पासून उत्पन्न, ओला कचर्यापासून कंपोस्ट खताची निर्मिती केली आहे. त्यामुळे पालिकेच्या मेहनतीमुळे आणि नागरिकांच्या सहकार्यामुळे गेल्या वर्षाच्या तुलनेने 59 क्रमांकाने उडी घेतली आहे. पालिकेच्या या यशाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.

पालिकेने राबविले विधिध उपक्रम

नगरपरिषदेने कचरामुक्ती बरोबर प्लाॅस्टीक मुक्ती करण्यासाठी ही शहरात मोठे काम केले. पालिका कार्यालयात प्लाॅस्टीक बॅंक उघडविण्यात आली होती. ‘एक पिशवी प्लाॅस्टीक आणा आणि एक कापडी पिशवी घेऊन जा’ अशी संकल्पना राबविली. त्याला शहरवासीयांनी चांगला प्रतिसाद दिला. तर शहरातील शाळांमध्ये ‘प्लाॅस्टीक आणा अन् बक्षिस जिंका’ ही स्पर्धा घेऊन विद्यार्थ्यामधे प्लाॅस्टीक मुक्तीबद्दल जनजागृती केली. प्लाॅस्टीक वापरणार्यावर मोठ्याप्रणात कारवाई हि केल्या. कचरा संकलनातुन गोळा झालेल्या कचर्याचे विलगीकरण करून प्लाॅस्टीक विक्रीतून उत्पन्न मिळविले.

भडगाव पालिकेने स्वच्छ सर्वेक्षण अभियानात गेल्यावर्षीपेक्षा पुढचा क्रमांक पटकावला आहे. मागच्यावर्षी 108 व्या क्रमांकावर होता. यावेळी झोन मधे 49 व्या तर राज्यात 40 व्या क्रमांकावर आलो आहोत, याचे समाधान आहे. पालिकेच्या कर्मचार्यासह भडगावकरांनी घेतलेली मेहनतीमुळे हे शक्य झाले.
-विकास नवाळे मुख्याधिकारी नगरपरिषद भडगाव

Leave A Reply

Your email address will not be published.