स्टेट बँक ऑफ इंडियाच्या ग्राहकांचे आणि कर्मचाऱ्यांचे होत आहेत हाल

0

मुक्ताईनगर (प्रतिनिधी)  : भारतातील सर्वात मोठी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडिया  (state bank of india-sbi) मध्ये खाते असणाऱ्या ग्राहकांचे केवायसी अपडेट नसल्यामुळे, खातं आता बँकेकडून गोठवलं (फ्रीझ) जात आहे.  एसबीआयने ग्राहकांना दिलेल्या अलर्टकडे खातेधारकांनी दुर्लक्ष केल्यामुळे त्यांना चांगलंच महागात पडत आहे.

एसबीआयने आपल्या खातेधारकांना केवायसी (KYC) अपडेट (update) करण्याचं आवाहन केलं होते. जर खातेधारकांनी  केवायसी अपडेट केलं नाही तर त्यांचं खातं गोठवलं जाऊ शकते अशी सूचना दिलेली होती.  एसबीआयने २८ फेब्रुवारीपर्यंत ग्राहकांना केवायसी अपडेट करण्याची विनंती केलेली होती. बँकांमध्ये Know Your Customer म्हणजेच KYC करणं हे अत्यंच महत्त्वाचं असतं. केवायसी अपडेट न केलेल्या ग्राहकांना एसबीआयने नोटीस पाठवली होती. २८ फेब्रुवारीपर्यंत केवायसीसाठी आवश्यक असलेली कागदपत्रे सादर केली नाहीत तर अशी खातं गोठवलं जातील असा इशारा एसबीआय (sbi) ने आपल्या ग्राहकांना दिलेला होता.

या इशाऱ्याकडे दुर्लक्ष केलेल्या ग्राहकांची खाती गोठवली गेली आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ग्राहकांना बँकेत कागदपत्रे घेऊन केवायसी अपडेट करण्यासाठी धावपळ करावी लागत आहे यामुळे सर्वत्र ग्राहकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.

कोरोनामुळे कमीत कमी संपर्क व्हावा याची काळजी घेणे अपेक्षित असतानाच केवायसीच्या अपडेशन च्या कामामुळे ग्राहक आणि कर्मचारी यांच्यावर दबाव वाढला आहे.

यामुळे ग्राहकांना त्यांच्या खात्यातून व्यवहार करता येत नाहीत आणि बँकेचे कर्मचारी लोकांना समजावता समजावता मेटाकुटीला आले आहेत.

कोरोनाच्या महामारीच्या काळात स्टेट बँक ऑफ इंडिया चे कर्मचारी देखील कोरोना योद्धा चे काम पार पाडत आहेत. भुसावळ येथील स्टेट बँकेची शाखा चार कर्मचारी पॉझिटिव्ह आल्यामुळे चार दिवस बंद ठेवावी लागली होती.

स्टेट बँक ऑफ इंडीयाचे सर्व ग्राहक आणि कर्मचारी यांना दिलासा देण्यासाठी केवायसी अपडेट करण्यासाठी ग्राहकांना सवलत द्यावी अशी विनंती खासदार रक्षाताई खडसे यांनी वित्तमंत्री यांच्याकडे लोकसभेत केली.

Leave A Reply

Your email address will not be published.