स्कॉर्पियो आणि कंटेनरलाच्या भीषण अपघातात ९ ठार, एक जखमी

0

प्रतापगड (उत्तर प्रदेश) – मुसळधार पावसादरम्यान आज पहाटे ट्रक आणि स्कॉर्पियोचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात ९ जणांचा मृत्यू झाला, तर एक जण जखमी झाल्याची घटना युपी मधील प्रतापगड जिल्ह्यातील नवाबगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये चार पुरुष, तीन महिला आणि दोन लहान मुलांचा समावेश आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अपघातग्रस्त स्कॉ्र्पियोमधील प्रवासी हे बिहारमधील भोजपूर येथून राजस्थानमध्ये एका कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी निघाले होते. दरम्यान, नवाबगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीत त्यांच्या स्कॉर्पियोची एका कंटेनर ट्रकला धडक बसली. ही धडक एवढी जोरदार होती की त्यात स्कॉर्पियोचा चेंदामेंदा झाला तसेच आतील नऊ जणांचा मृत्यू झाला.

दरम्यान, चेंदामेंदा झालेल्या चारचाकीमधून मृतदेह बाहेर काढण्यासाठी गॅस करटचा वापर करावा लागला. या स्कॉर्पियोचा ड्रायव्हर अपघातात गंभीर जखमी झाला आहे. त्याला उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या आपघाताबाबत दु:ख व्यक्त केले आहे. तसेच जखमींवर योग्य उपचार करण्याचे आदेश दिले आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.