फैजपूर येथे ३ कोरोना पॉझिटीव्‍ह आढळले

0

फैजपूर । फैजपूर कोवीड सेंटरने २३ कोरोना संशयित व्यक्तीचे स्वॅब तपासणीसाठी पाठविले होते. त्यापैकी २० जणांचे अहवाल निगेटिव्ह तर ३ जणांचा अहवाल पॉझिटीव्‍ह आला आहे. त्यामुळे शहरातील कोरोना बाधित रूग्णांचा आकडा पाच झाल्याने प्रशासनाच्या चिंतेत भर पडली आहे.

गेल्या आठवड्यात आठवड्यात फैजपूर पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकाऱ्याला कोरोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले होते. तर दुसऱ्या दिवशी आणखी एकाला बाधा झाली होती त्यांनतर या पोलीस अधिकाऱ्याच्या परिवारातील व संपर्कातील १३ पोलिसांचे तपासणीसाठी स्वॅब घेण्यात आले होते तसेच अन्य अशा एकूण ८० जणांचे स्वॅब घेऊन तपासणी साठी पाठविण्यात आलेले होते. त्यापैकी २३ जणांचे अहवाल आज प्राप्त झाले असून तीन रूग्ण पॉझिटीव्ह आढळून आले आहे. आढळून आलेल्या कोरोना बाधितांमध्ये पोलीस अधिकाऱ्याच्या मुलीचा व दोन पोलिसांचा समावेश आहे.
यातील बाधित एक पोलीस भुसावळ येथे वास्तव्यास आहे. त्याचप्रमाणे फैजपूर येथे दुसरा बाधित पोलीस राहत असलेला परिसर पालिका प्रशासनाने सील केला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.