सोलापूर येथील स्मितकिरण पब्लिशिंग प्रा. लि.च्या स्किलबुक या आंतरराष्ट्रीय उपक्रमात शिवचरण उज्जैनकर फाउंडेशनचा सहभाग

0

मुक्ताईनगर (प्रतिनिधी) : येथील शिवचरण उज्जैनकर फाउंडेशन ही गेल्या १४ वर्षापासून शैक्षणिक, सामाजिक, साहित्यिक, कला आणि आरोग्य अशा विविध क्षेत्रांमध्ये विशेष उपक्रम राबवून महाराष्ट्रामध्ये व बाहेरील राज्यांमध्ये सुद्धा सुपरिचित झालेले आहे. नुकतेच स्मितकिरण पब्लिशिंग प्रायव्हेट लिमिटेड बार्शी जिल्हा सोलापूर येथील संस्थेच्या स्किल बुक या आंतरराष्ट्रीय उपक्रमांमध्ये येथील शिवचरण उज्जैनकर फाउंडेशनचा सक्रिय सहभाग नोंदवला जात आहे ही एक भूषणावह बाब म्हणावी लागेल. त्यासंदर्भातील फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष शिवचरण उज्जैनकर यांना नुकतेच स्मितकिरण पब्लिशिंग प्रायव्हेट लिमिटेड यांचे कडुन नुकतेच मेल द्वारे पत्र प्राप्त झाले.

स्किल बुक हि एक कोटी विद्यार्थ्यांना एक लाख कौशल्याशी जोडण्याचा महत्वाकांक्षी प्रकल्प आहे. त्यासाठी स्मितकिरण प्रकाशन संस्था ना नफा ना तोटा या तत्वावर काम करत आहे. या योजनेसाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर व्यवसाय प्रशिक्षण या विषयात डॉक्टरेट मिळवणारे डॉ.किरण झरकर हे पहिले कौशल्यदुत आहेत. त्यांच्या व्यवसाय प्रशिक्षण परियोजना या शोध प्रबंधावर आधारित स्किल बुक हि संकल्पना आहे.

या संकल्पनेत ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची कौशल्ये यांचे स्किलबुक या डिजिटल प्लॅटफॉर्मवर साठवुन ती आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रकाशित केली जाणार आहेत. तसेच त्यांना प्रमाणित केले जाणार आहे. भारत सरकारच्या स्किल इंडिया या संकलनेला बळ देण्यासाठी विद्यार्थी व शेतकरी यांना कौशल्याशी जोडुन त्यातुन मानवी जीवन सुखकर करण्याचा हा महत्त्वकांक्षी प्रकल्प आहे.

या संकल्पनेत कौशल्य प्रकाशन, कॉपी राईट, पेटंट, उद्योग उभारणी तसेच त्यांची प्रसिद्धी करण्याचा समावेश आहे. देशात ग्रामीण भागात होणारे संशोधन जगासमोर आणून त्याला मान्यता देण्याचा हा देशव्यापी कार्यक्रम आहे. तसेच या अंर्तगत दरवर्षी कौशल्यदुतांना पुरस्कार, फेलोशिप, शिष्यवृत्ती दिली जाणार आहे. तसेच दरवर्षी आयोजित होणाऱ्या कौशल्ययात्रेत  कौशल्य कार्यशाळा आयोजित करून शासन, कंपन्या व विद्यार्थी यांचा समन्वय केला जाणार आहे.

या आंतरराष्ट्रीय कार्यक्रमासाठी लाभार्थी यांची निवड करण्यासाठी फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष शिवचरण उज्जैनकर, आर्ट कॉमर्स सायन्स महिला महाविद्यालय तासगाव येथील प्राचार्या डॉ. भारती पाटील, कास्टट्राईब कर्मचारी संघटना मुंबई यांचे औरंगाबाद जिल्हाध्यक्ष डॉ. विलास जोंधळे यांची राष्ट्रिय समन्वयक म्हणुन नियुक्ती केली आहे.  तसेच याकामी मुख्य पार्टनर म्हणुन सुनिल बेळगावे, बेळगावे प्रायव्हेट लिमिटेड सांगली हे काम पहात आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.