सोने-चांदीच्या भावात पुन्हा वाढ, तपासा आपल्या शहरातील भाव

0

नवी दिल्लीः कोरोनाच्या संकटामुळे देशभरात अनिश्चिततेचे वातावरण निर्माण झालेय. त्याचा परिमाण आता सोने-चांदीसारख्या मौल्यवान धातूंवरही होत आहे. जून डिलिव्हरीसाठी एमसीएक्स सोन्याचे वायदा भाव मंगळवारी 4 मे रोजी दुपारी 2:46 वाजता 0.20 टक्क्यांनी घसरून 47,223 रुपयांवर गेला. तो प्रति 10 ग्रॅम 5 रुपयांनी घसरून 47,314 रुपयांवर बंद झाला. सोन्याच्या दर  आंतरराष्ट्रीय बाजारात कमी झालेले असले तरी देशांतर्गत बाजारात वाढलेत. तज्ज्ञांच्या मते, अल्पावधीत सोन्याचे दर 47,800 रुपयांवर जातील आणि सोन्याच्या किमतीतील प्रत्येक घसरणीला खरेदीची संधी म्हणून पाहिले पाहिजे.

तर 24 कॅरेट सोन्याच्या किमती 10 ग्रॅमसाठी 49,980 रुपये

दिल्लीमध्ये 4 मे रोजी 22 कॅरेट सोन्याच्या किमती 45,780 रुपये आहेत, तर 24 कॅरेट सोन्याच्या किमती 10 ग्रॅमसाठी 49,980 रुपये आहेत. सोन्याच्या दहा ग्रॅमच्या किमतीत 210 रुपयांची वाढ झाल्याचं समोर आलंय. त्याचप्रमाणे मुंबईतही दोन्ही कॅरेटच्या सोन्याच्या किमतीत 210 रुपयांनी वाढ झालीय. गुंतवणूकदार 22 कॅरेटचे 10 ग्रॅम सोने 44,570 रुपयांना आणि 24 कॅरेटचे सोने 45,570 रुपयात खरेदी करू शकतात. कोलकातामध्येही सोन्याच्या दोन्ही कॅरेटमध्ये प्रति 10 ग्रॅम 210 रुपयांची वाढ झाली. शहरात 22 कॅरेट सोन्याचे दहा ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याची किंमत अनुक्रमे 46,520 रुपये आणि 49,310 रुपये आहे.

दिल्ली, मुंबई आणि कोलकाताच्या तुलनेत चेन्नईत सोन्याच्या किमतीमध्ये जास्त वाढ नोंदवली गेलीय. चेन्नईमध्ये 22 कॅरेटच्या सोन्याची किंमत 300 रुपयांच्या वाढीसह प्रति 10 ग्रॅमची 44,520 रुपये आहे. 24 कॅरेट सोन्याची किंमत 330 रुपयांच्या वाढीनंतर 48,570 रुपये आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर सोन्याची किंमत 6.80 डॉलर म्हणजेच 0.38 टक्क्यांनी घट झाल्यानंतर पहाटे 4:56 वाजता 1,786.10 होती. भारतात चांदीच्या दरात प्रति किलो 2,500 रुपयांची वाढ झाली आहे. गुड रिटर्न्सनुसार एक किलोग्राम चांदीची किंमत 70,000 रुपये आहे. बड्या शहरांमध्ये चांदीची प्रतिकिलो किंमत 70,000 रुपये असली तरी चेन्नई आणि हैदराबादमध्ये चांदीची किंमत, 73,500 रुपये प्रति किलो आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.