सोने-चांदीच्या दरात वाढ ; जाणून घ्या आजचा नवा दर

0

मुंबई : मागील दोन तीन दिवसापासून सोने-चांदीच्या दरात घसरण पाहायला मिळाली होती. मात्र, आज या घसरणीला ब्रेक लागला असून आज कमॉडिटी बाजारात सोने आणि चांदीच्या दरात वाढ झाली आहे.

 

सध्या मल्टी कमॉडिटी एक्सचेंजमध्ये सोन्याचा भाव ४९३४४ रुपये आहे. त्यात ४०५ रुपयांची वाढ झाली आहे. चांदीचा भाव एक किलोसाठी ६४२५२ त्यात ७७६ रुपयांची वाढ झाली आहे. सोमवारी कमॉडिटी एक्सचेंजमध्ये सोन्याचा भाव ४८९२६ रुपये होता. त्यात ३९८ रुपयांची घसरण झाली होती. तर चांदीमध्ये ३१३ रुपयांची घसरण झाली होती.

 

आज सकाळपासून दोन्ही धातूंनी सकारात्मक सुरुवात केली. जागतिक बाजारात सोन्याचा भाव ०.२ टक्क्यांनी वधारला. सोन्याचा दर प्रती औंस १८३१.९ डॉलर होता. तर चांदीचा भाव प्रती औंस २३.८७ डॉलर आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.