सोग्रस येथे मुंबई -आग्रा महामार्गावर अपघात १० ठार

0

मुंबई -आग्रा महामार्गावरील सोग्रस येथे आज पहाटे वाळूचा ट्रक आणि मिनी ट्रॅव्हल्स चा भीषण अपघात झाल्याचे वृत्त समोर आले आहे. या अपघातात १० जण ठार तर १३ जण गंभीर जखमी झाल्याचे समजते आहे. जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून मृतांची संख्या वाढण्याची भीती आहे. या अपघातातील सर्वजण कल्याण, उल्हासनगर आणि नाशिक येथील रहिवासी असल्याचं सांगण्यात येत आहे.

याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, आज पहाटे सहा वाजण्याच्या सुमारास हा भीषण अपघात झाला. वाळूचा ट्रक आणि मिनी ट्रॅव्हल्समध्ये जोरदार धडक झाल्याने हा अपघात झाला. या भीषण अपघातात ट्रॅव्हल्समधील ५ जणांचा जागीच मृत्यू झाला. तर पाच जखमींचा रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला. इतर जखमींवर चांदवडमधील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हे सर्व जण देवदर्शनासाठी मध्य प्रदेशातील उज्जैन येथे गेले होते. देवदर्शनाहून परतत असताना काळानं त्यांच्यावर घाला घातला. हे सर्वजण कल्याण, उल्हासनगर आणि नाशिक परिसरातील असल्याचं पोलीस सूत्रांनी सांगितले . दरम्यान, याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.