समांतर रस्त्याची निविदा आठवड्याभरात मार्गी लागणाार

0

ना. नितीन गडकरी यांचे सुरेशदादांना आश्वासन

  जळगाव-

शहरात महामार्ग विस्तार आणि समांतर रस्ते तयार करण्याचा डीपीआर केंद्रीय मंत्रालयाकडे सादर होवून जवळपास दोन महिने झाले आहे. या डीपीआर नुसार कामाची ई-निविदा अद्याप निघालेली नाही. त्यामुळे समांतर रस्ते कृती समितीतर्फे नॅशनल हायवे अ‍ॅथॉरिटी, जिल्हाधिकारी यांच्याकडे सतत पाठपुरावा केला जात आहे. नॅशनल हायवे अ‍ॅथॉरिटीचे नवे प्रकल्प संचालक श्री. सिन्हा नुकतेच रूजू झालेले आहे. त्यांना पाठपुरावा करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी दिल्या आहेत.

दरम्यान समांतर रस्त्यांसाठी ई-निविदा मार्गी लागावी म्हणून माजी आमदार व खान्देश विकास आघाडीचे नेते सुरेशदादा जैन यांच्याशी समांतर रस्ते कृती समिती सदस्यांनी चर्चा केली. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे याविषयीचा पाठपुरावा करण्यासाठी श्री. सुरेशदादा जैन यांना विनंती केली. श्री. सुरेशदादा जैन यांनी गडकरी यांच्याशी दूरध्वनीवर संपर्क केला. श्री. गडकरी स्वत: बैठकीत व्यस्त होते. त्यामुळे त्यांनी रात्री उशीरा स्वत: श्री. सुरेशदादा जैन यांच्याशी संपर्क केला. श्री. सुरेशदादांनी जळगाव शहरालगत समांतर रस्ते व महामार्ग रूंदीकरणासाठी तयार करण्यात आलेल्या 139 कोटी रूपये खर्चाच्या डीपीआर चा विषय केला. त्यावर श्री. गडकरी म्हणाले, “या आठवड्याभरात डीपीआर मंजूर करून त्याची ई-निविदा प्रसिद्ध केली जाईल. हे काम करण्याबाबत मी स्वत: आग्रही आहे.“  श्री. सुरेशदादा यांना श्री. गडकरी यांनी दिलेल्या आश्वासनानुसार आता 8 दिवसात समांतर रस्ते व महामार्ग विस्तारासठी ई-निविदा निघण्याची प्रतिक्षा आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.