सुरक्षा रक्षकांचे वेतन रखडले; जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन

0

पाचोरा, लोकशाही न्यूज नेटवर्क 

सरकारी दवाखान्यांमधील करार तत्वावर नियुक्तीस असलेल्या सुरक्षा रक्षकांचे वेतन गेल्या ८ – ९ महीन्यांपासून रखडल्याने जळगाव, धुळे, नंदुरबार या जिल्ह्यातील सुमारे २०० कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ येऊन ठेपली आहे. आपल्या वेतनाविषयी तातडीने व्यवस्था व्हावी यासाठी संघटनेद्वारा जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांना मागणीचे लेखी निवेदन देण्यात आले.

सुरक्षा रक्षकांवर उपासमारीची वेळ 

गेल्या आठ महिन्यापासून वेतन थकीत असल्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आलेली आहे. घरातील विद्युत पुरवठा खंडीत केलेला आहे. अशा परिस्थितीत सुरक्षा रक्षकांनी काय करावे ? असाही प्रश्न निवेदनाद्वारे उपस्थित केला आहे. सध्या सुरक्षा रक्षक कर्जबाजारी, उपासमारी आणि कुटुंबाची स्थिती अत्यंत गंभीर स्वरुपाची झालेली आहे. त्यामुळे कौटुंबिक अडचणी लक्षात घेऊन सुरक्षा रक्षकांचे थकीत वेतन अदा करण्यात यावे, अशी मागणीही आरोग्य विभागातील जिल्ह्यातून सर्व सुरक्षा रक्षक मंडळाच्या सुरक्षा रक्षकांनी केली आहे.

अनुदानाची मागणी केली होती. त्यानुर त्यांना सर्व माहिती पुरविली आहे. मात्र, अद्यापही अनुदान उपलब्ध झालेले नाही. कोरोना महामारीच्या काळात वर्क ऑर्डरमध्ये नसलेले काम सुध्दा मयत असलेल्या कोरोना संसर्गजन्य रुग्णांना रॅपींग किटमध्ये बांधून त्याचे काम केलेले आहे. कुटुंबाची दखल न घेता कोरोना महामारीत रात्रंदिवस काम केलेले आहे. तरीही सुरक्षा रक्षकांचे वेतन अद्याप मिळालेले नाही.

जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देते वेळी जगदीश सोनार, देवेंद्र घोंगडे, गणेश चव्हाण, जितु माळी, सागर सोनवणे, तुषार चौधरी, विजु माळी, नामदेव मराठे, ईश्वर कोळी, अक्षय जाधव, राजु वानखेडे, गोपाल मराठे, ईश्वर बडगुजर, विशाल तायडे, तुकाराम निळे, गोविंदा चावरे, अरूण चौधरी, अपरांत साळुंखे, विजय बारी, जितेंद्र चौधरी आदी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.