सा.बा.विभागाचा हलगर्जीपणा : तीन दिवसांपासून झाड रस्त्यावरच असल्याने वाहनधारक संतप्त

0

पारोळा :- पारोळा-चाळीसगाव या मुख्य रहदारी असलेल्या रस्त्यावर हनमंतखेडे व जोगलखेडेच्या दरम्यान तीन दिवसापुर्वी आलेल्या वादळामुळे झाड पडले असुन झाड रस्त्याच्या मध्यभागीच असल्याने येजा करणाऱ्या वाहन धारकांना मोठ्या प्रमाणात कसरत करावी लागत आहे. पारोळा ते चाळीसगाव हा रस्ता सर्वाधिक वाहतुक असणारा रस्ता असुन औरंगाबाद जाण्यासाठी अतिशय सोईस्कर आहे.या रस्त्याने पारोळाकडे येणारे किंवा चाळीसगाव कडे जाणाऱ्या वाहनधारकांना खुपच ञासाचा सामना करावा लागत असुन वाहनधारक ञस्त झाले आहेत. याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाने सोईस्कर दुर्लक्ष केले असुन तीन दिवस होऊन देखील झाड बाजुला करण्यासाठी काहीच पर्यन्त झाले नसल्याचे संबंधित गावातील ग्रामस्थ तसेच वाहन धारकांनी सांगितले. झाड अचानक समोर येत असल्याने वाहनधारक जलद ब्रेक दाबत असुन त्यामुळे अपघात होण्याची शक्यता निर्माण होत आहे.झाडाला लवकरात लवकर बाजुला करण्यात यावे अशी मागणी वाहनधारक करीत आहेत.

याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाशी संपर्क केला असता,इलेक्शन ड्युटी ला असल्याने संबंधित घटना लक्षात आली नाही. झाड पडलेल्या ठिकाणी लगेच कर्मचारी पाठवुन त्वरीत रस्ता सुरळीत केला जाईल,असे कार्यकारी अभियंता व्ही.एम.घुघरी यांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.