सावधान ! कोरोनाचे दिल्लीत आढळले २ रुग्ण

0

नवी दिल्ली । जगभरात दहशत पसरवणारा नरसंहारक करोना व्हायरस आता देशाची राजधानी दिल्लीपर्यंत पोहोचला आहे. दिल्लीत कोरोना विषाणूचे दोन नवीन रुग्ण आढळले आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने याबाबत माहिती देताना सांगितले की, दिल्ली आणि तेलंगणामध्ये प्रत्येकी एका रूग्णात कोरोनाची माहिती मिळाली आहे. पूर्वी कोरोना विषाणूची माहिती झालेली दिल्लीची रहिवासी यापूर्वी इटलीला गेली होती. त्याचवेळी तेलंगणाचे रुग्ण दुबईला गेले होते. मंत्रालयाने म्हटले आहे की, कोरोनामुळे त्रस्त दोन्ही रुग्णांची प्रकृती स्थिर आहे. ते डॉक्टरांच्या देखरेखीखाली आहेत. दोन्ही रुग्णांच्या परदेशी प्रवासाची माहिती घेण्यात येत आहे.

हे दोन नवे रुग्ण आढळल्यानंतर आता रुग्णांवर बारिक लक्ष पुरवण्यात येत असल्याचे आरोग्य मंत्रालयातून सांगण्यात येत आहे. या दोन्ही रुग्णाची प्रकृती स्थिर असल्याची माहितीही आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. या पूर्वी चीनमधून आणण्यात आलेल्या भारतीय नागरिकांना मानेसर येथील अलिप्त केंद्रांमध्ये ठेवण्यात आले आहे. या लोकांनी कुणालाही भेटण्याची परवानगी नाही. तर, दुसरीकडे परदेशातून येणाऱ्या सर्व प्रवाशांची विमानतळावर थर्मल स्क्रीनिंग करण्यात येत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.