सावदा येथे तडवी समाज सामूहिक विवाह सोहळा उत्साहात

0

सावदा : येथे आदिवासी एकता मंचातर्फे दि.28 रोजी सकाळी 11 वाजता तडवी समाज्याचे जोडप्यांचे सामूहिक रित्या लग्न लावून तडवी समाज्यात एक आदर्श विवाह सोहळा घडवून आणला.आजच्या युगात विवाह करणे हे आदिवासी गरीब समाज्याची चिंतेची बाब असून अत्यंत अल्प खर्चात विवाह करणे काळाची गरज आहे. या करता आदिवासी एकता मंच यांच्या वतीने सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करून जोडप्यांचे लग्न लावून समाजातील सर्व चाली रीतीने फाटा  देऊन आदर्श विवाह सोहळा पार पडला.

आजपासून 14 युवकांच्या संसाराची सुरवात झाली. उत्तम नियोजन करून सर्व कार्यक्रम उत्साहात पार पडला. एक महिन्या पासून गावोगावी समाजातील दानशूर लोकांन कडे एकता मंच कमेटीने जाऊन पैसा जमा केला आणि लग्न सोहळ्याचा सामूहिक विवाहाचा कार्यक्रम घडवून आणला. कुणा जवळन पैसे न घेता 14 जोडप्यांचे मोफत लग्न लावून दिले मागच्या वर्षी पण 34 जोडप्यांचे लग्न लावून दिले. आज ते आनंदात आपला सुखी संसार चालवत आहे. समाजात जाऊन 14 लग्नाचे युवक युवती शोधून त्यांना सामूहिक विवाह करण्याचा सल्ला दिला. लग्नात वधू वरास संसार उपयोगी भांडे कपडे मोफत देण्यात आले.

एवढ्या मोठया कार्यक्रमात एकता मंचचे सदस्य यांनी आपल्या कामाचा मोबदला न घेता चोख कामगिरी बजावली सर्व वधू वरांना आपल्या घरीच लग्न झाल्या सारख वाटलं पूर्ण लग्न आदिवासी पारंपारिक रित्या पार पाडले एकूण 80 मंडप टाकले होते त्यात जेवणाचा खर्च एम.बी.तडवी सर (यावल) यांनी केला.

मंडपाच्या खर्च बबलू तडवी जळगाव यांनी व राजू अमीर तडवी मुंबई यांनी केला. देणगी दारांच्या सहकार्यामुळेच हा लग्न सोहळा पार पडत असतो. या मेळाव्याला चोपडा, यावल, रावेर तालुक्यातील समाज बांधवांची हजारोच्या संख्येने उपस्थिती होती. आदिवासी एकता मंचा कडून दर वर्षी असा कार्यक्रम राबवला जातो.

 29 वर्षाची तडवी समाज्याची वाटचाल पुर्विच्या काळात लग्न करण्याच झाल तर कर्ज काढून जमीन गहान ठेऊन आपल्या जमिनीत कामाला जाऊन लग्न होत असे पण आता समाज जागरूक झालाय बिना पैशाने थाटामाटात तडवी समाज लग्न पार पाडू शकतो.

दरम्यान यावेळी श्री.अनिल (रा.भुसावळ) यांनी दोन शब्दात आपले मनोगत व्यक्त केले. वर-वधूस आशिर्वाद दिले व तडवी समाज्यासाठी केव्हाही हजर राहीन सेवा करण्याची संधी द्या, असे मा. आमदार शिरीष दादा चौधरी यांनी वाढू वरांना आशिर्वाद दिला या परंपरेला ज्यांनी सुरवात केली त्यांची आठवण आल्या शिवाय राहात नाही ज्यांचा विवाह येथे झाला आहे. त्यांची जी संतती होईल ती देशासाठी कामाला येईल, असेही ते म्हणाले. यावेळी वधूवरांना हंडा, कळशी, घडयाळ, कपडे देण्यात आली.

यावेळी खासदार रक्षाताई खडसे, माजी आमदार शिरिषदादा चौधरी

, अनिल चौधरी, शबानाबी मुराद तडवी, सामाजिक कार्यकर्ते एम. बी. तडवी, हाजी हारून, नंदू महाजन, शेरखा चांदखा आदी मान्यवर उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.