सावखेडा, आव्हाणे, मोहाडी गावांचा मनपा हद्दीत समावेश

0

जळगाव : जळगाव महापालिकेच्या नवीन विकास आराखड्यात तालुक्यातील सावखेडा, आव्हाणे, मोहाडी या गावांचा मनपा हद्दीत समावेश करण्यासंदर्भात ठराव  महासभेत ठेवण्यात आला. त्याबरोबरच तालुक्यातील कुसुंबा शिवाराचा समावेश करण्याची शिफारसही स्थायी समिती सभापती राजेंद्र घुगे पाटील यांनी केली. दरम्यान, या प्रस्तावावर शिवसेना आणि एमआयएम यांनी विरोध दर्शविला असून, शहरातील नागरिकांना मूलभूत सुविधा मिळत नसताना या गावांचा महापालिका हद्दीत समावेश कशासाठी करत आहात, अशी भूमिका घेतली. मात्र, बहुमताच्या जोरावर हा ठराव मंजूर केला.

 

शुक्रवारी महासभेत ८५ विषयांवर चर्चा करण्यात आली. महापौर भारती सोनवणे अध्यक्षस्थानी होत्या. उपमहापौर सुनील खडके, आयुक्त सतीश कुलकर्णी, नगरसचिव सुनील गोराणे आदी व्यासपीठावर होते. ॲड. शुचिता हाडा यांनी महासभेत प्रशासनाच्या कामावर नाराजी व्यक्त केली.

 

११ विशेष समित्या

दरम्यान, महापालिकेच्या विविध ११ विशेष समित्या व सदस्यांची नावे महापौरांनी या वेळी जाहीर केली. त्यात बांधकाम समिती : प्रमुख- मुकुंद सोनवणे, सदस्य- सुरेश सोनवणे, लताबाई भोईटे, धीरज सोनवणे, नितीन बरडे, विक्रम सोनवणे.

अतिक्रमण समिती : प्रमुख- दत्तात्रय कोळी, सदस्य- नवनाथ दारकुंडे, किशोर बाविस्कर, धीरज सोनवणे, कैलाश सोनवणे, नितीन बरडे, इबा पटेल. स्वच्छता समिती : प्रमुख- जितेंद्र मराठे, सदस्य- रेश्मा काळे, सुरेखा तायडे, मीना सपकाळे, सुरेश सोनवणे, नितीन बरडे, प्रशांत नाईक.

पाणीपुरवठा समिती : प्रमुख- प्रवीण कोल्हे, सदस्य- उज्ज्वला बेंडाळे, प्रिया जोहरे, अमित काळे, शोभा बारी, नितीन बरडे, प्रशांत नाईक.

विद्युत समिती : प्रमुख- पार्वताबाई भिल, गायत्री राणे, कुलभूषण पाटील, सुनील खडके, उषा पाटील, नितीन बरडे, इबा पटेल.

शिक्षण समिती : प्रमुख- सरिता नेरकर, सदस्य- ज्योती चव्हाण, अंजनाबाई सोनवणे, खान रुक्सानाबी गबलू, सचिन पाटील, नितीन बरडे, प्रशांत नाईक.

नियोजन समिती : प्रमुख- सदाशिव ढेकळे, सदस्य- भगतराम बालाणी, सिंधू कोल्हे, सुरेखा तायडे, मंगला चौधरी, विष्णू भंगाळे, अनंत जोशी.

अस्थापन समिती : प्रमुख- ज्योती चव्हाण, सदस्य- मनोज आहुजा, शेख हसीना बी शरीफ, राजेंद्र पाटील, चेतना चौधरी, नितीन बरडे, प्रशांत नाईक.

विधी समिती : प्रमुख- ॲड. दिलीप पोकळे, सदस्य- ललित कोल्हे, गायत्री राणे, रंजना सोनार, चेतन सनकत, सुनील महाजन, अनंत जोशी.

दवाखाना समिती : प्रमुख- डॉ. चंद्रशेखर पाटील, सदस्य- अश्‍विन सोनवणे, कांचन सोनवणे, विश्‍वनाथ खडके, प्रतिभा पाटील, नितीन बरडे, मनोज चौधरी.

वाहन समिती : प्रमुख- विजय पाटील, सदस्य- रेखा पाटील, प्रतिभा देशमुख, सुरेखा सोनवणे, मीनाक्षी पाटील, नितीन बरडे, विक्रम सोनवणे.

 

अन्य ठराव असे :

शिवाजीनगरच्या नवीन उड्डाणपुलाचे ‘श्री छत्रपती शिवाजी महाराज उड्डाणपूल’ असे नामकरण करणे

कालंकामाता मंदिराच्या पाठीमागील क्रीडांगणाला स्व. लतामाई रमेश बाविस्कर यांचे नाव देणे

बजरंग बोगद्यासमोरील चौकास ‘कै. रणजित आप्पा भोईटे चौक’ नाव देणे

शिव कॉलनी प्रवेशद्वारास ‘श्री छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वार’ असे नाव देणे

कालंकामाता मंदिराजवळील चौकाचे ‘लेवा पाटीदार चौक’ असे नामकरण करणे व चौक सुशोभीकरण करणे

Leave A Reply

Your email address will not be published.