डॉ. संतोष पाटील यांना आदर्श समाजरत्न पुरस्कार

0

पाचोरा  (प्रतिनिधी) :  गोराडखेडा ता. पाचोरा येथील डॉ. संतोष पाटील यांना ग्रीन फाउंडेशन महाराष्ट्र राज्य यांच्यातर्फे आदर्श समाजरत्न   पुरस्काराने गौरविण्यात आले.  संतोष पाटील हे गोराडखेडा ता. पाचोरा, जि. जळगाव येथील रहिवासी असून ते व्याख्याते व लेखक त्याचबरोबर न्यू हायस्कूल, भोकरदन येथे कार्यरत शिक्षक आहेत. संतोष पाटील हे विभिन्न प्रकारचे कार्य करत असतात.

संपूर्ण देशभरात ते आपल्या व्याख्यानाच्या माध्यमातून व्यसनमुक्ती व तरुणांना प्रेरणादायी व्याख्याने देत असतात. त्याचबरोबर ते छत्रपती शिवाजी महाराज व सर्व महामानव यांच्यावर समाजातील तळागाळापर्यंत त्यांचे विचार पोहचवण्याचे कार्य करत आहे. विभिन्न प्रकारच्या दुर्गम भागात व वाड्यावस्त्यांवर जाऊन ते सर्व महामानवांचे विचार पोहोचवतात. व्याख्यानाचे मिळालेले मानधन हे आयोजकांनी सांगितलेल्या विभिन्न प्रकारच्या अनाथालय वृध्दाश्रम किंवा समाजोपयोगी कार्यासाठी ते खर्च करत असतात. याच त्यांच्या कार्यासाठी त्यांना न्यू ग्रीन फाउंडेशन महाराष्ट्र राज्य यांच्यावतीने आदर्श समाजरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला. ऑनलाईन झालेल्या या कार्यक्रमात त्यांना हा पुरस्कार व ट्रॉफी प्रदान करण्यात आली . यामुळे त्यांचे सर्व स्तरांवरून अभिनंदन व कौतुक होत आहे

Leave A Reply

Your email address will not be published.