सावंगा (विठोबा) येथील गुढीपाडवा रामनवमी यात्रा महोत्सव रद्द

0

अमरावती (प्रतिनिधी) : महाराष्ट्रासह देशभरात सुप्रसिद्ध व लाखो भाविक भक्तांचे श्रद्धास्थान असलेले. अमरावती जिल्ह्यातील चांदुर रेल्वे तालुक्यात येणाऱ्या सावंगा (विठोबा )येथील विठोबा उर्फ श्रीकृष्ण अवधूत बुवा मंदिरात होणारा गुढीपाडवा व रामनवमी यात्रा महोत्सव कोरोनाविषाणू च्या वाढत्या पादुर्भाव मुळे रद्द करण्यात आल्याचे संस्थांतर्फे प्रसिद्धी पत्रकातून कळविण्यात आले आहे.

सुमारे चारशे वर्षांपूर्वी अवधूत पंथाची स्थापना करणारे श्री कृष्णाजी अवधूत महाराजांच्या पावन सावंगा विठोबा नगरीत गुढीपाडव्याच्या दिवशी लाखो भाविक भक्तांचा जनसागर लोटत असतो. देशातील लाखो भाविक भक्त कृष्णाजी महाराजांच्या समाधीचे दर्शन घेऊन. लाखो रुपयांचा कापूर जाळतात.व आपल्या मनातील भावना व्यक्त करतात .तसेच येथील समतेचे प्रतीक असलेल्या 72 फूट ऊंच झेंड्यांना पदस्पर्श न करता नवीन खोड चढविण्याचा भव्य दिव्य व चित्तथरारक ऐतिहासिक धार्मिक विधी लाखो भाविक भक्तांच्या उपस्थितीत पार पाडला जातो. दरवर्षीप्रमाणे यंदाहि संस्थानच्या वतीने 13 एप्रिल ला गुढीपाडवा यात्रा महोत्सव व 21 एप्रिल ला रामनवमी यात्रा महोत्सव आयोजित केला होता. परंतु सध्याच्या परिस्थितीनुसार कोरोना विषाणूचा वाढत्या प्रादुर्भावामुळे यात्रेला येणाऱ्या भाविकांना गर्दीमुळे संसर्ग होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

त्यामुळे यात्रेत येणाऱ्या भाविकांच्या दृष्टीने अमरावती जिल्हाधिकारी यांच्या आदेशान्वये व संस्थांनी घेतलेल्या निर्णयामुळे संस्थान मधील सर्व यात्रा महोत्सव स्थगित करण्यात येत आहे. श्रीकृष्ण अवधूत संस्थान शासनाला सर्वतोपरी सहकार्य करण्यास कटिबद्ध असून. कोरोनाविषाणू च्या वाढत्या प्रादुर्भावामुळे श्री विठोबा संस्थान चा गुढीपाडवा व रामनवमी यात्रा महोत्सव रद्द करण्यात आल्याचे. संस्थांतर्फे प्रसिद्धी पत्रकातून सांगण्यात आले आले असून भाविक भक्तांनी सहकार्य करण्याचे आवाहन संस्थांचे अध्यक्ष वामनराव रामटेके, सचिव गोविंदराव राठोड, उपाध्यक्ष कृपासागर राऊत, विश्वस्त हरिदास सोनवाल, विनायक पाटील, पुंजाराम नेमाडे, अनील बेलसरे, फुलसींग राठोड ,दिगंबर राठोड, स्वप्निल चौधरी, विश्वास रामटेके, वैभव मानकर आदींनी केली आहे

Leave A Reply

Your email address will not be published.