मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेच्या सुमारे 11 कोटी रुपयांच्या निधीतून विविध रस्त्यांचे पालकमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन

0

ग्रामीण भागात रस्त्यांचे जाळे निर्माण करणार :- पालक मंत्री

अमरावती (प्रतिनिधी) ग्रामविकासाला चालना देण्यासाठी जिल्ह्यात ग्रामीण भागात सर्वदूर रस्त्यांचे जाळे उभारण्यात येईल असे प्रतिपादन राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री एडवोकेट यशोमती ठाकूर यांनी उद्घाटन प्रसंगी सांगितले .
मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेत सुमारे 11 कोटी निधीतून जिल्ह्यातील विविध ग्रामीण रस्त्याचे भूमिपूजन पालकमंत्र्यांच्या हस्ते 4 एप्रिल 2021 रोजी संपन्न झाले.

त्यावेळी त्या बोलत होत्या चांगापुर व विविध ठिकाणी झालेल्या भूमिपूजन समारंभाला खासदार नवनीत राणा , माजी राज्यमंत्री तथा आमदार प्रवीण पोटे पाटील, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बबलू भाऊ देशमुख, राष्ट्रवादी काँग्रेसचे संजय खोडके, जिल्हा परिषद सभापती संगीताताई तायडे , माजी महापौर विलास इंगोले, बबलू शेखावत , उपविभागीय अधिकारी उदय सिंग राजपूत , तहसीलदार संतोष काकडे , यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते . पालक मंत्री श्रीमती ठाकूर म्हणाल्या की मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेत जिल्ह्यातील अधिकाधिक कामांचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे ग्रामीण परिसरात अनेक रस्त्यांची निर्मिती होऊन गावे एकमेकांशी जोडली जातील . दळणवळण वाढून व्यवहाराला गती येईल व स्थानिकांचे जीवनमान उंचावेल केकतपूर येथे मुख्यमंत्री ग्राम सडक योजने अंतर्गत एस एच 308 ते माळेगाव केकतपूर (एल 04) रस्ता , ब्राह्मणवाडा भगत येथे अंतोरा ते ब्राह्मणवाडा रस्त्याचे भूमिपूजन , चांगापूर येथे एम एस एच 14 ते चांगापुर रस्ता , निमखेड येथे मुख्यमंत्री ग्राम सडक योजने अंतर्गत एस एच 14 ते निमखेड (एल 04) रस्ता, निंदोडि येथे एस एच 47 ते उदापूर- निंदोडी (एल14) रस्ता ,वासेवाडी एस एच 280 ते वासेवाडी (एल 06) रस्ता ,आदि अकरा कोटीहून अधिक रकमेच्या कामांचे भूमिपूजन पालकमंत्री यांच्या हस्ते यावेळी झाले.

चांगापुर तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी अधिकाधिक विकास कामे राबविण्यात येतील .पौराणिक व ऐतिहासिक स्थळांचा विकास करण्यासाठी प्राधान्याने अनेक कामे हाती घेण्यात आली आहेत. ब वर्ग क्षेत्र समावेश व इतर अपेक्षित कामे पूर्ण करण्यात येतील अशी ग्वाही यावेळी पालकमंत्र्यांनी दिली . तसेच केकतपूर येथे रस्त्याच्या शुभारंभा बरोबरच नळ पाणीपुरवठा योजनेचा शुभारंभहि झाला. जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागातर्फे सुमारे चोवीस लक्ष निधीतून ही योजना साकारण्यात आली आहे. त्याच प्रमाणे केकतपूर येथील व्यायाम शाळेचा शुभारंभही पालकमंत्र्यांच्या हस्ते झाला.

Leave A Reply

Your email address will not be published.