‘ब्रेक दि चेन’ : जाणून घ्या महाराष्ट्रातील निर्बंधांची ‘ए टू झेड’ नियमावली

0

राज्यात करोनाच्या पार्श्वभूमीवर नियमावली कठोर करण्यात आली आहे. राज्य सरकारने गर्दी टाळण्यासाठी दिवसा जमावबंदी, तर रात्री संचारबंदी लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार येत्या शनिवार-रविवारी (10-11 एप्रिल) लॉकडाऊन करण्यात येईल. तसेच सोमवार ५ एप्रिल रात्री ८ पासून ३० एप्रिलपर्यंत याची अंमलबजावणी केली जाणार आहे. या आदेशांना मिशन बिगीन अगेन ऐवजी ‘ब्रेक दि चेन’ असे संबोधण्यात येणार.

महाराष्ट्रात सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेविषयी नियम काय?

– ऑटो रिक्षामध्ये ड्रायव्हरसह दोन प्रवाशांना परवानगी
– टॅक्सीत ड्रायव्हरसह एकूण प्रवासी संख्येच्या 50 टक्के प्रवासी बसवण्यास परवानगी
– सार्वजनिक वाहतुकीतील सर्वांनी मास्क वापरणं बंधनकारक, न वापरल्यास 500 रुपये दंड
– सार्वजनिक वाहतुकीत असणाऱ्या व्यक्तीने आपले कोव्हिड लसीकरण करुन घ्यावे
– 10 एप्रिलपासून सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतील ड्रायव्हर आणि स्टाफला कोरोना निगेटीव्ह RTPCR रिपोर्ट बंधनकारक
– रिपोर्ट जवळ न ठेवल्यास प्रत्येकी 1000 रुपयांचा दंड
– ड्रायव्हरने गाडीत स्वतःला प्लॅस्टिक कव्हरने प्रवाशांपासून विलग ठेवल्यास RTPCR रिपोर्टची गरज नाही
– लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्यामध्ये जनरल डब्यात उभ्याने प्रवास करण्यास मनाई
– सर्व प्रवाशांनी मास्क घालून प्रवास करण्याची गरज

महाराष्ट्रात खासगी वाहतूक व्यवस्थेविषयी नियम काय?

– खाजगी वाहनधारकांसह बसेसला सोमवार ते शुक्रवार सकाळी 7 ते रात्री 8 वाजेपर्यंत प्रवासाची परवानगी
– येत्या शुक्रवारी (9 एप्रिल) रात्री 8 वाजल्यापासून ते सोमवारी (12 एप्रिल) सकाळी 7 वाजेपर्यंत खासगी वाहनांना प्रवासास परवानगी नाही
– केवळ अत्यावश्यक आणि अतितातडीच्या कारणांसाठी खासगी वाहनांना शुक्रवार रात्री 8 ते सोमवारी सकाळी 7 पर्यंत परवानगी
– खासगी बसेसमधील कर्मचारी आणि स्टाफने कोरोना लसीकरण लवकरात लवकर करून घ्यावं
– 10 एप्रिलपासून खाजगी वाहतुकीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी कोरोना RTPCR चाचणी निगेटीव्ह असणं बंधनकारक
– ही कोरोना निगेटीव्ह RTPCR चाचणी 15 दिवसाच्या कालावधीसाठी ग्राह्य धरणार
– RTPCR चाचणी नसल्यास 1 हजार रुपयांचा दंड (Maharashtra Lockdown All Rules and Guidelines)

प्रार्थना स्थळांसाठी नियम काय?
– सर्व धार्मिक स्थळ भाविकांसाठी बंद राहणार
– धार्मिक स्थळाशी संबंधित पुजारी, कर्मचारी फक्त धार्मिक स्थळी प्रवेश
– धार्मिक स्थळाशी संबंधित पुजारी, कर्माचाऱ्यांनी लवकरात लवकर कोरोना लसीकरण करावे

हॉटेल, रेस्टॉरंट आणि बारसाठी ब्रेक द चेन नियम

– सर्व रेस्टॉरंट आणि बार बंद ठेवावे लागणार
– रेस्टॉरंट्सना ग्राहकांना पार्सल सेवा किंवा होम डिलीव्हरी सेवा देण्यासाठी सोमवार ते शुक्रवार सकाळी 7 ते रात्री 8 वाजेपर्यंत सुरु ठेवण्यास परवानगी
– शनिवारी आणि रविवारी सकाळी 7 ते रात्री 8 वाजेपर्यंत फक्त होम डिलीव्हरी सेवा सुरु राहणार, ग्राहकांना प्रत्यक्ष जाऊन जेवण पार्सल नेता येणार नाही
– निवासी सेवा पुरवाणाऱ्या हॉटेल्सच्या बार आणि रेस्टॉरंट्सना केवळ हॉटेलमध्ये वास्तवास असलेल्या पाहुण्यांना सेवा देता येणार
– 10 एप्रिलपासून रेस्टॉरंटमधून डिलीव्हरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा RTPCR कोरोना रिपोर्ट निगेटीव्ह असणं बंधनकारक
– ही कोरोना निगेटीव्ह RTPCR चाचणी 15 दिवसांच्या कालावधीसाठी ग्राह्य धरणार
– RTPCR चाचणी नसल्यास 1 हजार रुपयांचा दंड
– हॉटेल, रेस्टॉरंटमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी कोरोना लसीकरण लवकर करुन घ्यावं

दुकान, बाजारपेठा आणि मॉल्ससाठी नियम

– अत्यावश्यक वस्तूची दुकान , बाजार वगळता सर्व दुकानं , बाजार आणि माँल्स बंद राहतील
– अत्यावश्यक दुकानात काम करणा-या मालकासह आणि कर्मचा-याचं लवकर कोरोना लसीकरण करणं गरजेचं
– ग्राहक आणि दुकानदार यांच्यात पारदर्शक काच किंवा प्लाँस्टिकच्या पारदर्शक शिल्डचा वापर करणं गरजेचं
– सोशल डिस्टन्सिंग ठेवणं महत्त्वाचं

शाळा आणि महाविद्यालय नियम

– शाळा आणि महाविद्यालय पूर्णपणे बंद असतील
– 10 आणि 12 विद्यार्थ्यांच्या परीक्षेसाठी नियमात शिथिलता असेल.
– परीक्षा घेणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांनी कोरोना लस घेतलेली असावी.
– कर्मचा-यांचा RTPCR कोरोना चाचणी रिपोर्ट निगेटीव्ह असावा (हा रिपोर्ट केवळ 48 तास ग्राह धरणार )

लग्न कार्यासाठी नियम

– 50 जणांच्या उपस्थितीत लग्न कार्यास परवानगी
– लग्न समारंभात सेवा देणा-या हाँल कर्मचा-यांचं कोरोना लसीकरण झालेले असावं
– हॉलमधील कर्मचा-याचं RTPCR रिपोर्ट निगेटीव्ह असावं
– RTPCR कोरोना चाचणी निगेटीव्ह असल्य़ाचा रिपोर्ट नसल्यास 1 हजार रूपायांचा दंड आणि हाँलच्या व्यवस्थापनाला
– 10 हजार रूपायांच्या दंडाची शिक्षा
– सतत हाँल आणि मंगलकार्यलयाकड़ून नियमाचं उल्लघंन झाल्यास संबंधित परिसर सील केला जाणार

अत्यसंस्कारासाठी ब्रेक द चेन नियम

–20 जणांच्या उपस्थितीत अत्यसंस्कार करण्यास परवानगी
–स्मशानभूमीतील कर्मचा-यांनी कोरोना लसीकरण केलेलं असावं
–किंवा RTPCR कोरोना चाचणी रिपोर्ट निगेटीव्ह असणं बंधनकारक

सहकारी निवासी सोसायटीसाठी नियम

–सहकारी निवासी सोसायटी 5 पेक्षा कोरोना रूग्ण आढल्यास मायक्रो कंटेमेंट झोन घोषित केला जाणार
–अशा सोसय़टीने बाहेरून येणा-या सोसयटीत प्रवेश देता येणार नाही तसा फलक सोसायटीच्या दर्शनी भागासमोर लावावा लागेल
–सोसाय़टीकडून या नियमाचं पालन न झाल्यास 10000 रूपायांचा दंड बसणार
–सहकारी निवासी सोसायटीत नेहमी ये जा करणा-यांच्या RTPCR टेस्ट करून घेणं किंवा कोरोना लसीकरण करावं.

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.