‘सामना’तील अग्रलेख लता मंगेशकर यांच्या आवाजापेक्षाही गोड- धनंजय मुंडे

0

मुंबई :- एकेकाळी एकमेकांना पाण्यात पाहणारे शिवसेना आणि भाजपने युतीची घोषणा केली. राष्ट्रवादी काँग्रेसचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनीही शिवसेना आणि भाजपच्या युतीवरून ‘सामना’त प्रसिद्ध झालेल्या अग्रलेखाचा दाखला देत शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांना टोला लगावला आहे. सामना मधील आजचा आग्रलेख लता मंगेशकर यांच्या आवाजापेक्षाही गोड आहे. वाचलात का?, असा उपरोधिक सवाल मुंडे यांनी विचारला आहे.

लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्रित लढवण्याचा निर्णय घेतल्यानंतर अमित शाह, उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत घेऊन युती जाहीर केली. त्यानंतर विरोधी पक्षांसह सोशल मीडियावर युतीवर मोठ्या प्रमाणात टीका करण्यात येत आहे. शिवसेनेने ‘सामना’तून युतीवर टीका करणाऱ्यांचा समाचार घेतला आहे. जनतेच्या मनात कमी, पण आमच्या राजकीय विरोधकांच्या डोक्यात प्रश्नांचे किडे जरा जास्तच वळवळत आहेत. ‘युती’मुळे हे किडेमकोडे साफ चिरडले जातील या भीतीतून त्यांची वळवळ सुरू झाली असल्याचा टोला लगावला होता. याच अग्रलेखाचा आधार घेत धनंजय मुंडे यांनी शिवसेनेवर टीका केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.