सातोद येथे तरुणाची विषप्राशन करून आत्महत्या

0

यावल – तालुक्यातील सातोद येथे एका तरुणाने विषप्राशन करून आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी ७ वाजेच्या सुमारास उघडकीस आली. संजय बुधा वाघ (२७) असे या तरुणाचे नाव असून गावातील दर्गाजवळ मृतावस्थेत आढळून आला. दरम्यान या प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

संजय वाघ याची यावल तालुक्यातील डिगर येथे सासर वाडी आहे. मंगळवारी सासरच्या गावाला जातो असे सांगून घरातून बाहेर पडला होता. दरम्यान तो सासरी न पोहचता सातोद गावातील दर्गाजवळ विषारी औषध घेऊन मृतावस्थेत आढळून आला. यानंतर गावकर्यांनी पोलिसांना संपर्क करून घटनेची माहिती दिली. त्यानंतर जिल्हा सामान्य रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले असून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे. या घटनेबाबत यावल पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस अधिकारी करीत आहे

Leave A Reply

Your email address will not be published.