सातशे रुपयांची लाच स्वीकारताना तलाठी व कोतवालास अटक

0

पाचोरा –
तालुक्यातील वाडी येथील महीला तलाठ्याने वडीलांचे नावे असलेल्या मालमत्ता मुलाचे नाव वारस लावण्यासाठी दि.2 एप्रिल रोजी 700 रुपये लाच मागितली होती सदरचे आज वाडी येथील तलाठी कार्यालयात दि. 13 रोजी तक्रारदाराने कबुल करुन सविस्तर माहिती जळगाव येथील एसीबीच्या पथकाला कळविण्यात आली होती. पथकप्रमुख पोलीस उपअधीक्षक गोपाळ ठाकुर, पोलीस निरीक्षक निता कायटे, पोलीस नाईक शाम पाटील, अरुण पाटील, प्रशांत ठाकूर यांनी साफळा रचून महिला तलाठी पुनम रामलाल वरकड वय 30 वर्षं रा.पाचोरा कोतवाल मधुकर चुडामन पाटील वय 42 वर्षे रा. राजुरी बु यांना 700 रुपये लाच घेताना रंगेहाथ पकडले विशेष म्हणजे गेल्या दोन दिवसांपूर्वी सदरचा प्रकार होणार असल्याची पुर्व सुचना तलाठ्यास मिळालेली
असतांनाही तलाठ्याने पैसे स्विकारण्याची हिंमत केली. घटनेप्रकरणी पिंपळगाव हरे पोलीस ठाण्यात तलाठी व कोतवाला विरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला असून दोघांना अटक करण्यात आली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.