साकळीत कर्फ्यूची ‘ऐशी तैशी’

0
(किरण माळी)
साकळी, ता.यावल – संपूर्ण जगात कोरोना या विषाणू जन्य आजाराने थैमान घातले असतांना भारतातही आजार मोठया प्रमाणात बळावत आहे. तथापि या रोगाच्या प्रसारास प्रतिबंध लागावा यासाठी आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २१ दिवसांसाठी लॉकडाऊनची घोषणा केली आहे. मात्र सकाळी करांनी सर्वच प्रशासनाने ‘लॉकडाऊन ‘चे नियम धाब्यावर बसवत सकाळीत चक्क आठवडे बाजार भरविला गेला. एकूणच या गंभीर प्रकारामुळे सूज्ञ  नागरिकांच्या जिवाशी खेळ मांडलेला आहे का ? असा संताप जनक प्रश्न सूज्ञ नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. दरम्यान बाजार भरविल्या प्रकरणी गावातील सर्वच प्रशासन अपयशी ठरल्याचे दिसून येत आहे. शेकडो च्या संख्येने बाजार खचून भरलेला होता. या लोकांनी खचून भरलेल्या बाजाराच्या दुर्दैवी चित्राने सुज्ञ गावकऱ्यांमध्ये चिंता व्यक्त होत होती.
             याबाबत सविस्तर माहिती अशी की, कोरोना या महाभयंकर आजाराने जगभर सह भारतात ही थैमान घातले असतांना देशात लॉकडाऊन तर राज्यात कलम १४४ अंतर्गत संचारबंदी सुरू आहे. या कलमा अंतर्गत सार्वजनिक ठिकाणी ४  पेक्षा जास्त लोकांनी गर्दी हा कायद्याने गुन्हा असतांना सकाळी येथे आज दि २९ मार्च रविवार रोजी भवानी माता मंदिर परिसरात आठवडे बाजार भरविण्यात आला होता. या आठवडे बाजारात भाजीपाला सह मिठ- मिरची मसाला, खाद्य पदार्थ ची दुकाने, फळांची अशी ७० ते ८० दुकाने थाटली गेली होती. तर या बाजारात खरेदी करणाऱ्या साकळीसह परिसरातील पुरुष,महिला, व आबालवृद्ध ग्राहकांनी बिनधास्त काही शेकडो च्या घरात गर्दी केलेली होती. एकूणच प्रशासनाने घालून दिलेले नियम धाब्यावर बसवत बाजारासाठी चक्क ‘आरोग्याचा ‘ बाजार मांडत गावातील सूज्ञ नागरिकांची चिंता वाढविली आहे.
         दरम्यान  काल दि २८ रोजी गावापासून अवघ्या ३५ की मी अंतरावर कोरोनाची लागण झालेला रूग्ण आढळून आला ही खूप काळजीची गोष्ट असतांना सुद्धा साकळी चा बाजारच भरवून नागरिकांनी जणू एकमेकांच्या जिवाशी खेळ मांडला आहे का ? असा संताप जनक प्रश्न चर्चिला जात होता. या बाजारात ‘होम क्वांरटाईन ‘ चे शिक्के मारलेले सुद्धा मौजमाजा मारण्यासाठी बिनधास्त फिरत होते.तर अनेक महिला व इतर ग्रामस्थांनी साध्या कापडाने सुद्धा तोंड झाकलेले नव्हते. दरम्यान या बाजार प्रकरणी गावातील ग्रामपंचायत प्रशासन, पोलीस प्रशासन, आरोग्य प्रशासन या सर्वांनी कठोर कारवाईचे वेळीच  पाऊले उचलेले असते किंवा कठोर पाऊल उचलण्या संदर्भात ग्राहकांना व विक्रेत्यांना वेळीच बाजार भरविण्याबाबत सूचना केल्या असत्या तर बाजार भरविणाऱ्यांची हिम्मत वाढली नसती.एवढे मात्र खरे आहे. तरी या बाजार प्रकरणी पोलीस प्रशासनाकडून कोणती कठोर कारवाईचे पाऊल उचली जाणार ?  हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. गावात मुख्य चौकातील दररोजचा ग्रामंस्थांचा  वावर व अशा गर्दी च्या ठिकाणी  सध्याच्या काळात कठोरात- कठोर कारवाई होणे गरजेचे आहे. तेव्हाच गावकऱ्यांना शिस्त लागू शकते.असे ही सूज्ञ नागरिकांमधून बोलले जात आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.