सलुन,पार्लर व्यवसाय पुर्ववत सुरु करण्यात यावे ; नाभिक समाजाच्या वतीने तहसीलदारांना निवेदन

0

भडगावः- राज्यातील सर्व सलुन, पार्लर व्यवसाय पुर्ववत सुरु करण्यात यावे. तसेच वैजापुर ता. चोपडा येथिल अत्महत्याग्रस्त नाभिक समाज बांधव गणेश सैंदाणे यांच्या कुंटुबीयाना आर्थिक मदत द्या. या मागणी साठी येथिल नाभिक समाज मंडळाच्या वतीने तहशिलदार सागर ढवळे यांना निवेदन देण्यात आले.

महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी राज्यातील सलुन, पार्लर बंद बाबत आदेश दिला आहे. यामुळे सलुन व्यवसाईक बांधव सह नाभिक बांधव कुंटुंबाला उपासमारीला तोंड द्यावे लागत आहे. व्यवसाय बंद असल्याने काही नाभिक बांधव अत्महत्या करीत आहे. पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व सलुन दुकाने पुर्ववत तात्काळ सुरु करण्यास परवानगी द्यावी. तसेच चोपडा तालुक्यातील वैजापुर येथिल नाभिक समाज बांधव गणेश सुभाष सैदाणे याने सलुन व्यवसाय बंद असल्या कारणाने गळफास घेऊन आत्महत्या केली. कुंटुबप्रमुखाने अत्महत्या केल्याने सैदाणे कुंटुब उघड्यावर पडले आहे. या कुंटुंबीस आर्थिक मदत मिळावी. या मागणीसाठी महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे राज्यध्यक्ष कल्याणराव दळे व जिल्हाध्यक्ष रविंद्र (बंटुभाऊ) नेरपगारे यांच्या आदेशाने भडगाव येथिल श्री. संत सेना महाराज नाभिक समाज विकास मंडळाच्या वतीने तहशिलदार सागर ढवळे यांना निवेदन देण्यात आले.

यावेळी अध्यक्ष संजय पवार (पत्रकार), उपाध्यक्ष भरत चव्हाण, सचिव हिलाल नेरपगारे, खजिनदार विजय ठाकरे, कार्यकारणी सदस्य शिवाजी शिरसाठ, राजेद्र सोनवणे, काशिनाथ शिरसाठ, सुभाष ठाकरे, राजेद्र महाले, प्रभाकर नेरपगारे, निलेश महाले, संजय शिरसाठ, नंदु ठाकरे, विजय चव्हाण आदी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.