सर्वसामान्यांना पुन्हा एकदा झटका ; एलपीजी गॅस सिलेंडरच्या किंमतीत वाढ, ‘हे’ आहे नवे दर

0

नवी दिल्ली : वाढत्या महागाईने एकदा पुन्हा सामान्य माणसाला झटका दिला आहे. कारण पुन्हा एकदा एलपीजी गॅस सिलेंडरच्या किंमती वाढल्या आहेत. घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमती वाढल्याने सामान्यांचे एकंदरित महिन्याचे बजेट कोलमडले आहे. तेल कंपन्यांनी घरगुती एलपीजी गॅस सिलेंडरच्या किंमतीत 25 रुपयांची वाढ केली आहे. यानंतर सबसिडी नसणाऱ्या 14.2 किलोग्रॅमच्या एलपीजी गॅस सिलेंडरची दिल्लीतील किंमत 794 रुपये प्रति सिलेंडर झाली आहे.

 

हे नवीन दर 25 फेब्रुवारीपासून अर्थात आजपासून लागू होत आहेत. फेब्रुवारी महिन्यात तीन वेळा एलपीजी गॅस सिलेंडरचे दर वाढले आहेत. त्यामुळे पुढील महिन्यात सामान्यांना आणखी फटका सहन करावा लागणार का याबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.

 

डिसेंबरपासून 200 रुपयांनी वधारला एलपीजी गॅस

1 डिसेंबरपासून आतापर्यंत एलपीजी गॅस सिलेंडरच्या किंमतीत 200 रुपयांची वाढ झाली आहे. यामुळे सामान्यांच्या बजेटवर नक्कीच परिणाम होत आहे. दर 594 रुपयांवरून आज 794 रुपये प्रति सिलेंडर झाले आहेत.

 

कसे वाढले दर?

-1 डिसेंबर रोजी दर 594 रुपयांवरून 644 रुपये प्रति सिलेंडर झाले

-1 जानेवारी रोजी दर 644 रुपयांवरून 694 रुपये प्रति सिलेंडर झाले

-4 फेब्रुवारी रोजी दर 694 रुपयांवरून 719 रुपये प्रति सिलेंडर झाले

-15 फेब्रुवारी रोजी दर 719 रुपयांवरून 769 रुपये प्रति सिलेंडर झाले

-25 फेब्रुवारी रोजी दर 769 रुपयांवरून 794 रुपये प्रति सिलेंडर झाले

 

काय आहेत कमर्शिअल गॅसच्या किंमती?

दर महिन्याच्या पहिल्या तारखेला गॅस सिलेंडरच्या किंमती बदलतात. फेब्रुवारी महिन्यात देखील कमर्शिअल गॅसच्या किंमतीत 190 रुपयांची वाढ झाली आहे. यानंतर दिल्लीमध्ये या 19 किलोग्रॅमच्या सिलेंडरची किंमत 1533.00 रुपये प्रति सिलेंडर तर मुंबई, कोलकाता आणि चेन्नईमध्ये दर 1482.50 रुपये, 1598.50 रुपये आणि 1649.00 रुपये आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.