समाजाने विघातक शक्तीचा अंत करण्यासाठी एकत्र येणे गरजेचे – आ संजय सावकारे

0

भुसावळात जय मातृभूमी मंडळातर्फे रावण दहन कार्यक्रम

भुसावळ (प्रतिनिधी )- समाजात वाईट प्रवृत्ती वाढली असून अनेक  रावण  तयार झाले आहेत त्यामुळे आगामी काळात सर्व समाजाने एकत्र येवून  विघातक शक्तीचा अंत करण्यासाठी एकत्र येणे गरजेचे असून समाजातील अनेक वाईट  प्रवृत्तींचे दहन करण्यासाठी समाजाने ताकद  द्यावी, असे आवाहन आमदार संजय सावकारे यांनी येथे केले.  समाजात वेगवेगळ्या स्वरूपाचे रावण फिरत असतात मात्र त्यांच्या अंतासाठी राम जन्म घेत असतात, रावण दहनानिमित्त मातृभूमी मंडळातर्फे दरवर्षी रावण दहनाचा कार्यक्रम होतो व कार्यक्रम पाहण्यासाठी शहर व तालुक्यातील हजारो लोक येथे एकत्र येतात व त्यांच्या साक्षीने दरवर्षी रावणाचे दहन केले जाते.  विजयादशमीनिमित्त मंगळवारी रात्री जय मातृभूमी मंडळातर्फे टी.व्ही.टॉवर मैदानावर रावणासह मेघनाथ व कुंभकर्णाच्या पुतळ्याचे दहन करण्यात आले. याप्रसंगी आमदार सावकारे यांनी मनोगत व्यक्त केले.

रावणाचा अंत करण्यासाठी प्रभू श्रीराम वारंवार बाण मारत होते मात्र पुन्हा एक एक मुंडकीच्या स्वरूपात रावण समोर येत होता तेव्हा प्रभू रामांना रावणाच्या अमृतकुपीचे रहस्य कळाल्यानंतर त्यांनी रावणाचे छातीत बाण चालवल्यानंतर रावणाचा अंत झाला. भुसावळ शहरातही असे काही वाईट प्रवृत्ती असलेले  रावण आहेत त्यामुळे आगामी काळात एकत्र येवू समाजाने विघातक शक्तीचा अंत करण्यासाठी एकत्र येणे गरजेचे असून  समाजात वेगवेगळ्या स्वरूपाचे रावण फिरत असतात मात्र त्यांच्या अंतासाठी राम जन्म घेत असतात, असेही ते म्हणाले.

याप्रसंगी रावणाचे दहन खासदार रक्षा खडसे तर मेघनाथाचे आमदार संजय सावकारे यांच्या हस्ते तसेच कुंभकर्णाचे नगराध्यक्ष रमण भोळे यांच्या हस्ते दहन करण्यात आले. याप्रसंगी विविध रंगी-बेरंगी फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. यावेळी  खासदार रक्षा खडसे, नगराध्यक्ष रमण भोळे, नगरसेवक युवराज लोणारी, किरण कोलते आदींनी मनोगत व्यक्त केले.

रावण दहन कार्यक्रमास नगराध्यक्ष रमण भोळे, भाजपा संघटन सरचिटणीस प्रा.सुनील नेवे, नगरसेवक युवराज लोणारी, गटनेता मुन्ना तेली, नगरसेवक पिंटू कोठारी, नगरसेवक किरण कोलते, अॅड.बोधराज चौधरी, प्रमोद नेमाडे, विजय चौधरी, राजेंद्र पुंडलिक चौधरी, राजेंद्र नाटकर, उद्योजक मनोज बियाणी, सतीश सपकाळे, गिरीश महाजन, किशोर पाटील, अॅड.निर्मल दायमा, रजनी सावकारे, संगीता बियाणी यांच्यासह भाजपा नगरसेवक, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.