# व्हिडीओ : राष्ट्र सेविका समितीचे पथसंचलन उत्साहात संपन्न

0

जळगाव (प्रतिनिधी) :- राष्ट्र सेविका समितीही राष्ट्र कार्याथ काम करणारी महिलांची जगातली सर्वात मोठी संघटना आहे. जळगाव शहरात समितीच्या ६ शाखा आहेत, अशी माहिती शहर कार्यवाहिका संगीता अट्रावलकर यांनी दिली.

आज दि.९ रोजी राष्ट्र सेविका समितीचे सघोष पथसंचलन अत्यंत शिस्तीत संपन्न झाले. आजचे हे संचलन शहरातील चर्चेचा विषय झाले. दरम्यान, विजयादशमीच्या निमित्ताने जळगाव शहरातील ११५ महिलांनी सीमोल्लंघन केले.

संचलनात अग्रभागी संपूर्ण गणवेशातील दंडधारी सेविकांचे पथक होते. त्यानंतर रक्षिकांसह भगवाध्वज संचलनात डौलाने फडकत होता. संपूर्ण संचलन ज्याच्या तालावर पावले टाकत होते ते घोषपथक ध्वजापाठोपाठ होते. वादक महिला आनक (ड्रम), पणव(ढोल), वंशी (बासरी), झल्लरी (मोठे झांज) मोठ्या तालात वाजवीत होत्या व सर्वांचे लक्ष वेधून घेत होत्या. जळगाव शहरात अनेक वर्षानंतर असे संचलन झाले.

Leave A Reply

Your email address will not be published.