समाजसेवक सुमित पंडित यांची लोहारा गावास भेट

0

माणुसकीच्या माध्यमातून कार्यसिद्धी सुरू करणाऱ्या कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य

लोहारा ता.पाचोरा : तारुण्यात पदार्पण करीत असताना प्रत्यक्ष कृतीतून उल्लेखनीय असे समाजसेवेचे कार्य करणाऱ्या मराठवाडा औरंगाबाद येथील सुमित पंडित यांनी संपूर्ण महाराष्ट्रात आपल्या कार्याचा ठसा उमटवला याचा आदर्श घेऊन लोहारा सह परिसरातील तरुणांनी सुलक्ष्मी बहुउद्देशीय संस्थेच्या संलग्नित माणुसकी ग्रुपची स्थापना करून समाजसेवक सुमित पंडित यांच्या या कार्याला हातभार लावण्याचे काम सुरू केले आहे.

या कार्यकर्त्यांमध्ये समाजसेवेच्या कामाची अधिक गोडी निर्माण व्हावी व त्यांचे मनोबल वाढवले गेले पाहिजे असा निर्धार करून बुधवारी समाजसेवक सुमित पंडित यांनी लोहारा गावास अचानक भेट दिली. यामुळे समाज सेवेला कार्यातून हातभार लागावा म्हणून सहभागी होणाऱ्या उत्साही कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य पसरले. यावेळी सुमित पंडित यांनी नव्यानेच स्थापन झालेल्या व सहभागी झालेल्या कार्यकर्त्यांकडून अल्पशा कालावधीची कार्याची माहिती घेत आपल्या गत समाजसेवेच्या कार्याला उजाळा दिला. यावेळी यांनी गावाच्या परंपरेची रुग्णांच्या सेवेसाठी असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्राची तसेच गावातील परंपरा व लोहारा येथील हेड कॉन्स्टेबल निवृत्ती मोरे सांप्रदायिकतेत आपली कृती दाखवत असल्याने आवर्जून यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी माणुसकी ग्रुपचे अध्यक्ष गजानन क्षीरसागर तसेच येथील दैनिक पुण्यप्रतापचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर राजपूत व माणुसकी ग्रुपचे सन्माननीय कार्यकर्ते हजर होते. सन्माननीय समाजसेवक सुमित पंडित यांचा येथील श्रीराम मंदिरात गजानन क्षीरसागर यांच्या हस्ते शाल व श्रीफळ देऊन छोटेखानी सत्कारही करण्यात आला.

Leave A Reply

Your email address will not be published.