समाजमूल्यांची जडणघडण महत्वाची – प्राचार्य डॉ. एम. व्ही. बिल्दीकर

0

चाळीसगाव : येथील चा. ए. सो.  चे बि. पी. आर्टस्, एस. एम. ए. सायन्स, के. के. सी. कॉमर्स कॉलेज आणि के.आर.कोतकर कनिष्ठ महाविद्यालयात  राजमाता जिजाऊ  जयंती व स्वामी विवेकानंद जयंती उत्साहात साजरी.

चाळीसगाव :(प्रतिनिधी ) तालुक्यातील  चा. ए. सो.  चे बि. पी. आर्टस्, एस. एम. ए. सायन्स, के. के. सी. कॉमर्स कॉलेज आणी के.आर.कोतकर कनीष्ठ महाविद्यालयात  आज राजमाता जिजाऊ जयंती व स्वामी विवेकानंद जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाला उपस्थित महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एम. व्ही. बिल्दीकर, उपप्राचार्य डॉ. पी. एस. बाविस्कर, उपप्राचार्य ए. व्ही. काटे, उपप्राचार्य बी. आर. येवले तसेच राष्ट्रीय सेवा योजनेचे प्रमुख प्रा. नितीन नन्नावरे व उपस्थित मान्यवर यांनी प्रतिमा पूजन केले.

कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान स्वीकारत असताना समाजमूल्यांचे महत्व प्राचार्य डॉ. एम. व्ही. बिल्दीकर यांनी पटवून दिले. आज कालच्या धावपळीच्या जीवनात माणूस समाजामध्ये वावरताना त्याने कसे वागायला पाहिजे हे विसरत चालला आहे. त्यासाठी राजमाता जिजाऊ यांच्या शिकवणीची गरज आहे असे त्यांनी प्रतिपादन केले. स्वामी विवेकानंद यांनी विश्व् बंधुत्वाची शिकवण आपल्याला दिली ती तरुण पिढी ने अंगीकारावी असे प्रतिपादन त्यांनी केले. व्यक्तिमत्वाची जडणघडण होण्यासाठी सर्वश्रेष्ठ स्वामी विवेकानंद यांच्या मूल्यांचा अभ्यास विद्यार्थ्यांनी करायला हवा अशी त्यांनी त्यावेळी अपेक्षा व्यक्त केली.

त्याचबरोबर हिंदवी स्वराज्याची संकल्पना प्रत्यक्षात साकार करण्यासाठी छत्रपती शिवरायांना ज्ञान, चारित्र्य, चातुर्य, संघटन व पराक्रम अशा राजस व सत्त्वगुणांचे बाळकडू देणार्‍या राजमाता जिजाऊ यांच्या जीवनचरित्रावर उपप्राचार्य ए. व्ही. काटे यांनी प्रकाश टाकला.

युवा दिनाचे औचित्त्य साधून महाविद्यालयाचे प्रा. डॉ. जामतसिंग राजपूत यांना बंगलोर स्थित इन्स्टिटयूट स्कॉलर या संस्थेतर्फे २०२० चा यंग अचिव्हर पुरस्काराबद्दल मान्यवरांद्वारे सन्मानित करण्यात आले.

 

कार्यक्रमाचे  सूत्रसंचालन राष्ट्रीय सेवा योजनेचे प्रमुख प्रा. नितीन नन्नावरे यांनी केले तसेच आभार प्रदर्शन प्रा. आर. एस. पाटील यांनी केले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी उत्सव समितीचे प्रमुख प्रा. सुशीलकुमार पवार यांनी विशेष प्रयत्न केले. कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील प्राध्यापक वर्ग, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी आदी उपस्थित होते

Leave A Reply

Your email address will not be published.