प्राईम फोकसचे संपादक स्वप्नील वडनेरे यांची आदर्श पत्रकार प्रेरणा पुरस्कारासाठी निवड

0

चाळीसगाव (प्रतिनिधी) : पत्रकारीतेच्या माध्यमातून गावाचा ,परिसराचा कायापालट केला,सामाजिक परिवर्तन, प्रबोधन व प्रेरणादायी कार्य व सामाजिक कार्याबद्दल चाळीसगाव येथील  प्राईम फोकस मराठी मिडीया चे संपादक व दै.सामना चे प्रतिनिधी स्वप्नील मधुकर वडनेरे यांना विभागीय “आदर्श पत्रकार प्रेरणा पुरस्कार- २०२१”जाहीर करण्यात आला आहे.

खान्देश पत्रकार संघ धुळे तर्फे पत्रकार स्नेह मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून नाशिक, धुळे,जळगाव,नंदुरबार, अ.नगर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील एक पत्रकार विभागीय आदर्श पत्रकार  प्रेरणा पुरस्काराने सन्मानीत करण्यात येणार आहे. सदर पुरस्कार वितरण समारंभ दि.-१७/१/२०२१ रविवार

वेळ-दुपारी १२-३० वा. धुळे येथे मान्यवरांच्या हस्ते होणार आहे.निवडीचे पत्र नुकतेच नियोजनसमितीचेप्रभाकर सूर्यवंशी(अध्यक्ष),महेंद्र येवले( उपाध्यक्ष),प्रेमकुमार अहिरे( महासचिव)

खान्देश पत्रकार संघ, धुळे यांच्या तर्फे स्वप्नील वडनेरे यांना प्राप्त झाले आहे. यापूर्वी ही MESMA या संस्थेचा “Best Journalist in Rural Area” हा पुरस्कार जाहीर झाला आहे.स्वप्नील वडनेरे यांना पुरस्कार जाहीर झाल्याने त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.