समता फाऊंडेशनतर्फे पांढरी गावातील गरोदर मातांना औषधी उपलब्ध

0

धानोरा, लोकशाही न्यूज नेटवर्क

समता फाऊंडेश औरंगाबाद यांच्या माध्यमातून आज प्राथमिक आरोग्य केंद्र धानोरा, अंतर्गत येणारे आरोग्य उप केंद्र पंचकमध्ये येणारे अती आदिवासी दुर्गम भागातील पांढरी या गावातील गरोदर माता, प्रस्तुती झालेल्या माता, कमी वजनाचे बालके, यांची तपासणी करून त्यांना समता फाऊंडेशन औरंगाबाद यांनी उपलब्ध करून दिलेली औषधी, प्रोटीन्स पावडर,गरोदर मातांच्या रक्त वाढीसाठी,तसेच आईच्या गर्भात असलेल्या बाळाचे चांगल्या प्रमाणे वाढ होण्यासाठी,आणि कमी वजनाचे बालक यांच्यासाठी ही उत्तम दर्जाची औषधे समता फाऊंडेशन यांच्या माध्यमातून पांढरी या गावात उपलब्ध करून दिली.

तसेच गरोदर माता, प्रसुती झालेल्या माता कमी वजनाचे बालक आणि इतर असे 155 रुग्णांची समता फाऊंडेशन यांच्या माध्यमातून तपासणी करून औषधे देण्यात आली. या ठिकाणी समता फाऊंडेशनचे प्रतिनिधी राजेंद्र दौंड, डॉ. उमेश कवडीवाले (वैद्यकीय अधिकारी), डॉ. फारुख शेख (समुदाय आरोग्य अधिकारी पंचक), एम. डी. माळी (आरोग्य सहाय्यक), वैशाली सोनवणे (आरोग्य सेविका), राहुल सोनवणे (आरोग्य सेवक), ललिता पावरा (अंगणवाडी सेविका), प्रिती बारेला (आशा वर्कर), प्रवीण ठाकुर आदी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.