सतरा विद्यार्थिनींना कोरोना

0

नाशिक – येथील दंतचिकित्सा महाविद्यालयातील सतरा विद्यार्थिनींना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले.

नाशिक शहरातील पंचवटी भागातील एका दंत महाविद्यालयातील 17 विद्यार्थिनींना कोरोना संसर्ग झाल्याचे आढळले आहे

नाशिक शहरातील पंचवटीतील केबीएच दंत महाविद्यालयातील एकूण ५२ विद्यार्थिनींचे शनिवारी स्वॅब घेण्यात आले होते. महाविद्यालय व्यवस्थापनाने एकूण 52 विद्यार्थिनींचे नमुने तपासणीसाठी घेतले होते त्यातील सतरा विद्यार्थिनींना संसर्ग झाल्याचे आढळले आहे. त्यांना महापालिकेच्या कोविड सेंटरमध्ये पुढील उपचारासाठी दाखल करण्यात येणार असल्याची माहिती महापालिकेच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. अजिता साळुंखे यांनी दिली.

या 17 विद्यार्थिनींना वसतिगृहातच विलगीकरणात ठेवण्यात आले असून सगळ्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले आहे. त्याचप्रमाणे महाविद्यालय इमारतही प्रतिबंधित क्षेत्र म्हणून सील करण्यात आली आहे.

नाशिक शहरामध्ये गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या वाढत असून गेले दोन दिवस शंभरच्यावर बाधित आढळले आहेत आज दिवसभरात 117 नवे रुग्ण वाढले असून 64 रुग्ण बरे झाले आहेत. मात्र, दिवसभरात एकही रुग्णाचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची नोंद नाही.

Leave A Reply

Your email address will not be published.