सतत लाईट जात असल्यामुळे नागरिकांचे हाल

0

किनगांव (प्रतिनिधी) : किनगाव येथे लाईट आली तर आली नाही तर गेले आशी म्हणण्याची वेळ आली असून आभाळ आला कि लाईट होते गुल व सनासुदीतही लाईटवाले जनतेला करतात एप्रिल फुल आशी वेळ येथील नागरिकावर आल्याचे चित्र पहावयास मिळते.

किनगाव येथे ३३ केव्ही उपकेंद्र असून एक नको भाराभर चिंध्या एवढे कर्मचारी आहेत.मात्र लाईट गेली की तासनं तास येत नाही आली तर हुलकावनी देऊन लंपडाव करते. सध्या मुस्लीम समाजाचा रमजान सन चालू असून शासनाने जनतेला लॉकडाऊन रात्रीची संचारबंदी, कडक निर्बंध लावल्यांने दीवस- रात्र घरातच बसावे लागत आहे रात्री शांत झोपावे तर लाईट तासानं तास लाईट जाते. हा विजेचा लंपडाव थांबवून जनतेच्या सोयीची करावी व उन्हाळयाच्या उखाडयात नागरिकास दीलासा द्यावा आशी चर्चा होत आहे.किनगावच्या कर्मचाऱ्यांना कसला लोड येतो याची नागरिकांना कल्पनाही नाही परंतू लाईटीच्या लंपडावाला नागरिक वैतागले असून सोलार प्रोजेक्ट ही आहे मग काय अडचण असावी अशीही चर्चा होतांना दीसते सध्या उन्हाळयाच्या उखाडयाने नागरिक त्रस्त झाली आहेत.कोणी लाईट का गेली म्हटले तर अहमदपूरहुनच लाईट गेली आहे,काम चालू आहे अशे उङवा उङवीची उत्तरे देतात.

रमजान महिन्यात भारनियमन बंद करण्याची मागणी आम्ही महावितरण सहायक अभियंता यांना जाकेर भाई मित्र मंडळाच्या वतीने निवेदन देउन केली आहे.परंतु लाईट तासानं तास बंद राहात आहे.सहायक अभियंता व लाईट म्यान यानां वार-वार फोन करून बोलत आहे.परंतु लाईट जाईची तर जातच आहे.

– जाकेर कुरेशी
संस्थापक अध्यक्ष जाकेर भाई मित्र मंडळ.

Leave A Reply

Your email address will not be published.