सकाळी रस्ते व मार्केट परिसरात गर्दी मात्र दुपारी शुकशुकाट

0

जळगाव (रजनीकांत पाटील) : कोरोनाचे वाढते संक्रमण रोखण्यासाठी १४ एप्रिलपासुन राज्यासह जिल्ह्याभरात  आठवडे बाजार, धार्मिक स्थळे सिनेमागृहे, शाळा, महाविद्यालय पुर्णतः बंद ठेवण्याचे निर्देश मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी दिलेले असुन किराणा, भाजीपाला, दुध कृषी विषयक साहित्य यासह विविध जीवनावश्यक वस्तु सकाळी सात ते अकरा वाजेपर्यंत सुरु ठेवण्याची मुभा देण्यात आलेली आहे.

अकरानंतर केवळ दवाखाने व मेडीकल उघडी राहतील आणि इतर वस्तुंची आस्थापने बंद ठेवण्याच्या सुचनाही  पालिकेने दिलेल्या असल्याने नागरीकांना खरेदी विक्री करण्यासाठी केवळ चार तास मिळत असल्याने शहरातील विविध वस्तुंच्या दुकानावर नागरीकांची खरेदी करण्यासाठी झुंबड उडत असुन सकाळी अकरा वाजे पर्यंत शहरातील मुख्य मार्केट सह शहरातील विविध ठिकाणी नागरीक तथा दोन चाकी, चार चाकी वाहनांची गर्दी होत असुन दुपारी अकरानंतर रस्ता गल्लीबोळात शुकशुकाट असते. या गर्दीमुळे कोराना होत नाही का असा सवाल उपस्थित होत आहे. त्यामुळे या गर्दीला शिस्त लावण्यासाठी प्रशासनाने पुढाकार घ्यावा, विनाकारण फिरून अनावश्यक गर्दी करणाऱ्यांना समज द्यावी, अशी मागणी सुज्ञ नागरीक करीत आहेत.

शहरातील विविध भागांत दररोज सकाळी सात वाजेनंतर वस्तू खरेदी-विक्री करण्यासाठी गर्दी होत असते

Leave A Reply

Your email address will not be published.