संरक्षण क्षेत्रातल्या ध्रुवताऱ्याला GPS परिवारातर्फे भावपूर्ण आदरांजली

0

पाळधी, लोकशाही न्यूज नेटवर्क

येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय शिक्षण मंडळ संचलित जीपीएस शैक्षणिक परिवारातर्फे आज भारतीय लष्कराचे CDS श्री. बिपिनजी रावत यांना आदरांजली देण्यात आली.

भारतीय लष्कराचे चीफ ऑफ डिफेन्स प्रमुख बिपिन रावत यांचे काल हेलिकॉप्टर अपघातात निधन झाले. यामुळे भारतीय संरक्षण क्षेत्राची मोठी हानी झाली.  याप्रसंगी त्यांना पाळधी येथील GPS परिवारातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष प्रतापरावजी पाटील, माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक कंखरे सर, इंग्लिश मीडियमचे प्रिंसिपल सचिन पाटील सर, कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य योगेश करंदीकर सर, तिन्ही शाखांचे सर्व प्राध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वर्ग, विद्यार्थी उपस्थित होते.

इंग्लिश मीडियमच्या कला शिक्षिका प्रीती पाटील यांनी फलकावर बिपिनजी रावत सरांची छबी काढून श्रद्धांजली अर्पण केली.

Leave A Reply

Your email address will not be published.