संदीप पाटील यांची एनसीटीएसच्या राष्ट्रीय सचिवपदी नियुक्ती

0

रावेर (प्रतिनिधी) : नॅशनल  कौन्सिल ऑफ टीचर सायंटिस्ट या संस्थेच्या झालेल्या ऑनलाइन बैठकीत आभोडे बु. येथील भाऊसाहेब रा.ग. महाजन आदिवासी माध्यमिक विद्यालयाचे उपशिक्षक संदीप डीगंबर पाटील यांची राष्ट्रीय सचिव पदी सर्वानुमते निवड करण्यात आली असून तसे पत्र संस्थेचे चेअरमन यांनी दिले आहे.

नॅशनल  कौन्सिल ऑफ टीचर सायंटिस्ट  या  संस्थेची ऑनलाइन राष्ट्रीय बैठक नुकतीच संपन्न झाली या बैठकीच्या अध्यक्षस्थानी नॅशनल कौन्सिल ऑफ टिचर्स सायंटिस्ट संस्थेचे अध्यक्ष डॉ. चंद्रमौली जोशी होते. तर यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून इस्रो संस्थेचे माजी वैज्ञानिक भरतभाई चनेरिया व शास्त्रज्ञ डॉक्टर जे. जे. रावल उपस्थित होते. या बैठकीच्या प्रास्ताविकात गुजरात राज्याचे संचालक डॉ. शांतीलाल भोरानिया यांनी बैठकीच्या आयोजनाबाबत ची माहिती उपस्थितांना दिली तसेच वैज्ञानिक संकल्पना शिक्षकांच्या माध्यमातून ग्रामीण भागातील स्तरापर्यंत पोहोचवण्यासाठी कोणकोणत्या उपाययोजना केल्या पाहिजे याबाबतची सविस्तर माहिती या बैठकीमध्ये प्रमुख पाहुण्यांनी  सांगितले  त्याचप्रमाणे  संस्थेचे फेसबुक पेज व ब्लॉग चे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले या बैठकीमध्ये नॅशनल कौन्सिल ऑफ टिचर्स सायंटिस्ट  या संस्थेचे महाराष्ट्राचे संचालक संदीप पाटील यांची राष्ट्रीय सचिव पदी नियुक्ती करण्यात आली. त्या आशयाचे पत्र  संस्थेचे अध्यक्ष डॉ. चंद्रमौली जोशी यांनी दिलेले आहे  या निवडीबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत असून  या बैठकीसाठी देशातील 23 राज्याचे संचालक उपस्थित होते या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन व आभार प्रदर्शन नोएडा येथील एनसीटीसी चे राष्ट्रीय संचालक डॉ. दीपक सिंन्हा यांनी केले.

Leave A Reply

Your email address will not be published.