आप्पासाहेब यु.एच करोडपती उच्च माध्यमिक विद्यालयाच्या १२ वी विज्ञान शाखेचा निकाल ९८.४३%

0

पारोळा (प्रतिनिधी) : श्री बालाजी विद्या प्रबोधिनी मंडळ संचलित आप्पासाहेब यु एच करोडपती उच्च माध्यमिक विद्यालयाच्या  बारावी विज्ञान शाखेच्या निकाल ९८.४३टक्के लागला असून यात विद्यालयातून  ५७६ गुण (८८.६१%)मिळवून  प्रथम क्रमांक पार्थ जगदीश पाटील  तर 560 गुण(८६.१५%)मिळवून  द्वितीय क्रमांक प्रणाली विश्वास पाटील व 557 गुण (८५.६९%) मिळवून तृतीय क्रमांक शर्व अभय पाटील या विद्यार्थ्यांना मिळाले असून १८ विद्यार्थी डिस्टिंक्शन ने उत्तीर्ण झाले  तसेच फस्टऀ क्लास मध्ये 26 विद्यार्थी आहेत . सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आप्पासाहेब श्री यु एच करोडपती सर तसेच सचिव डॉ. सचिन बडगुजर, सर्व संचालक मंडळ, विद्यालयाचे प्राचार्य श्री विजय बडगुजर सर यांनी अभिनंदन केले व भावी शिक्षणासाठी शुभेच्छा दिल्यात उत्तीर्ण विद्यार्थ्यांना बारावी विज्ञान शाखेच्या सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे मार्गदर्शन लाभल्याचे विद्यार्थ्यांनी बोलून दाखवले.

Leave A Reply

Your email address will not be published.