संतोष चौधरींच्या जामीनावर आता बुधवारी सुनावणी

0

भुसावळ प्रतिनिधी | पालिकेचे मुख्याधिकारी चिद्रवार यांना शिवीगाळ व शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी माजी आमदार संतोष चौधरी यांच्या अंतीम जामीन अर्जावर गुरुवारी (दि. २४) भुसावळ सत्र न्यायालयात सुनावणी झाली. त्यात माजी आमदार चौधरींच्या पक्षाने गुन्ह्याची कागदपत्रे सादर केली. यामुळे आता पोलिसांना त्यांचे म्हणणे सादर करण्यासाठी मुदत देण्यात आली. पुढील सुनावणी ३० जूनला होणार आहे.

शासकीय कामात अडथळा व मुख्याधिकाऱ्यांना शिवीगाळ केल्याच्या गुन्ह्यात माजी आमदार संतोष चौधरींना न्यायालयाने अंतरिम जामीन मंजूर केला आहे. अंतीम जामिनाच्या सुनावणीदरम्यान मंगळवारी (दि.२२) पोलिसांनी चौधरींवर १७ गुन्हे दाखल असल्याने ते हिस्ट्रीशिटर असल्याचा मुद्दा मांडला. त्यावर चौधरींचे वकील जगदीश कापडे यांनी हरकत घेतली होती. त्यांनी एक केस वगळता कोणत्याही केसमध्ये चौधरींना शिक्षा झाली नाही. उर्वरित केसेसमध्ये ते निर्दोष मुक्त झाले आहेत. चारपैकी दोन केसेस निकालावर आहेत. यामुळे त्यांना हिस्ट्रीशिटर म्हणता येणार नाही, असा युक्तीवाद केला.

यावर न्यायाधीश भन्साळी यांनी कागदपत्रे सादर करावी असे सांगून पुढील सुनावणी गुरुवारी ठेवली होती. गुरुवारी चौधरींच्या पक्षाने न्यायालयासमोर गुन्ह्याची कागदपत्रे सादर केली. त्यावर न्यायाधीश संजय भन्साळी यांनी पोलिसांचे म्हणणे ऐकून घेण्यासाठी वेळ देत पुढील सुनावणी ३० जून रोजी होईल असे स्पष्ट केले

Leave A Reply

Your email address will not be published.