श्वास बदल प्रक्रियेद्वारा सर्वच आजारांवर नियंत्रण मिळवणे सोपे – हरिनाथ महाराज

0

 यावल | प्रतिनीधी

यावला तालुक्यातील साकळी येथे  पाचोरा तालुक्यातील नाथ मंदिर जारगाव येथील नाथ मंदिरचे ट्रस्ट अध्यक्ष श्री हरीनाथ धुडकू महाजन व सोनाई ग्रुप पाचोरा यांच्या मार्फत सर्व आजारा विषयी विशेषतः कोणत्या व्यक्तीस ताप येऊ शकतो व त्यावर उपाय काय करता येईल या बाबींवर गेल्या २५ वर्षापासून संशोधन करुन जनतेत जनजागृती करुन विविध प्रकारे होणारे आजाराविषयी आज साकळी येथील प्लॉट भागातील रहिवाशी व पत्रकार बाळकृष्ण तेली यांचे घरी सदगुरू हरिनाथमहाराज यांनी सपत्नीक भेट दिली याप्रसंगी उपस्थीत शिष्यगण व ग्रामस्थ यांना या प्रक्रियेचे जनक सदगुुरू हरिनाथमहाराज यांनी जन जागृतीपर मार्गदर्शन केले. कोणताही साधा किंवा गंभीर आजार किंवा कोरोना जरी झाला तरी तो झाल्यावर श्वास बदल प्रक्रिया करून वरील सर्व आजारावर मात कशी करता येईल या विषयी मार्गदर्शन करून गावांत काही ठिकाणी फलक लावण्यात आले या कार्यक्रमास ग्रामस्थ यांनी चांगला प्रतिसाद दिला याप्रसंगी  येथील  ग्रामस्थ व इतर गावाहून आलेले शिष्य गण मोठया संख्येने उपस्तित होते. सोनाई ग्रुप पाचोरा यांनी केलेल्या या स्तुत्य उपक्रमाबद्दल  व ग्रामस्थां तर्फे येथील आदर्श पत्रकार बाळकृष्ण तेली यांनी त्यांचे आभार मानले व भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या !

Leave A Reply

Your email address will not be published.