श्री कालिका पद्मावती देवी मंदिर वार्षिक महोत्सवाचे आयोजन

0

२०,२१ जून रोजी भव्य कार्यक्रम – चितोडे वाणी समाजबांधवाना उपस्थिती चे आवाहन

बुरहानपुर –

येथील चितोडे वाणी समाज  संचालित श्री कालिका पद्मावती देवी मंदिरात 20 जून आणि 21 जून रोजी 99 वां वार्षिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानिमित्त भव्य शोभायात्रेसह विविध धार्मिक, सांस्कृतीक, सामाजीक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे. या भव्य दिव्य सोहळया साठी देशभरातील विवीध प्रांतांमधुन समाजबांधव उपस्थीत राहणार असल्याची माहीती आयोजकांनी दिली. चितोडे वाणी समाज एकत्रिकरणाच्या या प्रयत्नाला समाजातील सर्वांचे अनमोल सहकार्य लाभत आहे. कुलदेवीचा उत्सव असल्यामुळे समाजबांधव मोठया संख्येने उपस्थीत राहतील अशाही माहीती चितोडे वाणी समाज बुरहानपुर अध्यक्ष श्री संजय एकनाथ वाणी यांनी दिली. तर यावेळी बाहेर गावांचे सर्व चितोडे वाणी समाज अध्यक्ष प्रमुख अतिथी म्हणुन उपस्थीत राहणार आहे.तरी सर्व समाजबांधवांनी मोठया संख्येने उपस्थीत राहावे अशी विनंती बुरहानपुर चितोडे वाणी समाज एवं जय चिवास युवा शक्ति ची कार्यकारीणीच्या सदस्यांनी केली आहे.श्री कालिका पद्मावती देवी महोत्सवा निमीत्त 21 जून  वार गुरुवार रोजी सकाळी 7.30 वाजता घोड़े पर बैठने की बोली तत्पश्चात 8:30 वाजता भव्य दिव्य विलोभनिय शोभायात्रा काढण्यात येणार आहे. तसेच समाजातिल महिला मंडळ शोभायात्रे दरम्यान सहभागी होणार आहे. शोभा यात्रेच्या समारोपानंतर समाजमंदिरात श्री जी ची पूजन अभिषेक ची बोली , सांस्कृतिक कार्यक्रम आणि महाआरती आणि त्या नंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. बुरहानपुर येथील चि.वा.स. समाज मंदिरातील हा 99 वाँ वार्षिक महोत्सव आहे. शहर व परिसरातील समाज बांधवांमध्ये या महोत्सवासाठी उत्सुकता असून चैतन्याचे वातावरण आहे. कार्यक्रम यशस्वीतेसाठी चिवास युवा शक्ति व्  महीला मंडळाचे सर्व कार्यकर्ते परिश्रम घेत आहेत.हया कार्यक्रमास सर्व चि.वा.स. बंधु व भगिनींनी कुटुंबियांसह सहभागी होवून दर्शनाचा व महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन… चि.वा.स.कार्यकारिणी,­ चिवासमहीला मंडळ आणी जय चिवास युवा शक्ति संघठन बुरहानपुर परिसर तर्फे करण्यात येत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.