श्रीवाडेश्वर महादेव मंदिरात दानपेटी फोडली

0

मनवेल  ता.यावल, लोकशाही न्यूज नेटवर्क 

येथील साकळी-मनवेल रोडवरील शारदा विद्या मंदिर शाळेजवळील श्रीवाडेश्वर महादेव मंदिरात दानपेटी फोडली असल्याची घटना आज दि.२६ रोजी दुपारच्या वेळेस भाविकांच्या लक्षात आले.

या दानपेटीत जवळपास दोन ते अडीच हजार रुपये असल्याचे येथील मंदिराच्या कामकाज पाहणाऱ्या भाविकांनी सांगितले. दरम्यान सदरील घटना घडल्याने भाविकांमध्ये एकच खळबळ निर्माण झालेली असून या प्रकाराबाबत गावातील पोलिसांना कळवण्यात आलेले असून या प्रकाराबाबत यावल पोलिसात लेखी तक्रार करणार असल्याचे भाविकांनी सांगितले.

सकाळपासून दर्शनासाठी मंदिर उघडे असते याचा फायदा घेत अज्ञात व्यक्तीने साधारणतः दुपारच्या वेळेस परिसरात सामसूम असतांना दानपेटी फोडण्याचे कृत्त केले असावे असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. तरी या घटनेबाबत पोलीस प्रशासनाकडून तपास व्हावा अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.