शेवगे येथे महीलेची आत्महत्या

0

पारोळा | प्रतिनिधी

तालुक्यातील शेवगे बु, येथे एका ३० वर्षीय महिलेने विषारी औषध सेवन करून आत्महत्या केल्याची घटना घडली, याबाबत सविस्तर माहिती अशी की पारोळा तालुक्यातील शेवगे बु, येथील वैशाली प्रविण कोळी, (३०) रा, शेवगे, या महिलेने आपल्या निम्मे बटाई ने करीत असलेल्या शेतात काहीतरी विषारी औषध सेवन करून आत्महत्या केल्याची घटना घडली असून, याबाबत अधिक माहिती जाणून घेतली असता प्रविण कोळी, व वैशाली कोळी यांनी पुनगाव शिवारातील प्रल्हाद दौलत पाटील यांचे शेत निम्मे बटाई ने करण्यासाठी शेत घेतले होते या शेतात दोघेही काम करीत असताना प्रविण कोळी यांनी आपल्या बैलांना नदीवरून पाणी पाजून येतो म्हणून गेले ते परत आल्यावर पाहीले तर वैशाली यांच्या तोंडातून फेस येत होते त्यांनी लागलीच आपल्या बैलगाडी ने आपल्या गावी शेवगे बु येथे आणले व तेथून खाजगी वाहनाने पारोळा कुटीर रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता तेथील वैद्यकीय अधिकारी योगेश सांळूखे यांनी तपासणी करून त्यांना मृत घोषित केले याबाबत प्रविण शंकर कोळी रा, शेवगे बु, यांच्या खबरीवरून पारोळा पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यू ची नोंद करण्यात आली पुढील तपास हे, काॅ, विनोद माळी हे करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.