शेतीमुळे सुख, संपत्ती मिळवून उत्तम जगू शकतो

0

इनोव्हेशनमध्ये एम.जे. शहा विद्यालय बाहुबलीचा हायटेक स्पेअर प्रथम,  बिझनेस प्लॅन स्पर्धेत सोमेश्वर विद्यालय पुणेचा भाजीपाला सूप प्रथम 

जळगाव | प्रतिनिधी
शेती करून सुख, संपत्ती आणि प्रतिष्ठा मिळवून उत्तम पद्धतीने जगू शकतो हे तुम्ही फालीचे विद्यार्थी सिद्ध करू शकतील असा विश्वास जैन इरिगेशनचे उपाध्यक्ष अनिल जैन यांनी व्यक्त केला. जैन इरिगेशन सिस्टीम्स्‌ लि. व ‘ॲक्शन प्लॅटफार्म’तर्फे आयोजित भारताच्या कृषिक्षेत्रातील भविष्यदर्शी नायकांच्या ‘फाली-2019’ पाचव्या संमेलनाच्या दुसऱ्या सत्राचा आज समारोप समारोप सत्रात ते बोलत होते. यात इनोव्हेशन स्पर्धेत एम. जे. शहा विद्यालय, बाहुबली विद्यार्थ्यांनी सादर केलेले हायटेक स्प्रेअर प्रथम ठरले. तसेच बिझनेस प्लान स्पर्धेत पुणे जिल्ह्यातील सोमेश्वर विद्यालय अंजनगांव विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या भाजीपाला सूपने प्रथम क्रमांक पटकाविला.
जैन हिल्स आवारातील आकाश मैदानावर झालेल्या ‘फाली संमेलन-2019’ च्या दुसऱ्या टप्प्याच्या समारोपाप्रसंगी व्यासपीठावर जैन इरिगेशनचे उपाध्यक्ष अनिल जैन, जैन फार्म फ्रेश फुडस् च्या अमोली जैन, डॉ. डी.एन. कुळकर्णी, के. बी. पाटील, किशोर रवाळे, ॲक्शन प्लॅटफार्मच्या समन्वयिका नॅन्सी बेरी, गोदरेज एग्रोवेटचे डॉ. आर. एस. मसली, युपीएलचे प्रताप रनखांब, बायर क्रॉप सायन्सचे जिंतेंद्र गावंडे, स्टार ॲग्रीचे कैलास कलभंडे, रयत शिक्षण संस्थेचे कमलाकर महामुनी उपस्थीत होते. आरंभी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. दुसऱ्या टप्प्याच्या विजेत्या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. यावेळी सहभागी विद्यार्थ्यांना ‘फाली-2019’ टी शर्ट आणि कॅपचे वाटप करण्यात आले.फालीचे व्यवस्थापक हर्ष नौटियाल यांनी सूत्रसंचालन केले. रोहीणी घाडगे, सचिन पवार, प्रदीप गरकड यांनी सहकार्य केले. यावेळी नान्सी बेरी यांनी विद्यार्थ्याशी सुसंवाद साधला. त्याचे रोहिणी घाडगे यांनी हिंदीतून रुपांतर करून सांगितले. सहभागी विद्यार्थ्यांच्या जीवनात फालीमुळे काय परिवर्तन घडले याबाबत अनेक विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
फाली इनोव्हेशन स्पर्धेतील विजेते
फाली-2019 अंतर्गत घेतलेल्या दुसऱ्या टप्प्याच्या इनोव्हेशन स्पर्धेत विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. ऊस काढणी यंत्र, हायटेक प्रोटेक्टेड ग्रॅप फार्मिंग, शेती राखण यंत्र, इंटरक्रॉप शोविंग सिडरिल, मल्टिपर्पज सीड शोविंग मशीन, अग्रीकल्चर रिलेटेड मोबाईल एप, टोमॅटो तोडणी यंत्र, सोलर स्प्रेइंग पंप, बर्ड स्कॅरर, अग्रीकल्चर रोबोट, कारपेट गन, मिनी ट्रॅक्टर, ट्रान्सप्लान्टर, यासह अनेक इनोव्हेटीव्ह उपकरणे विद्यार्थ्यांनी सादर केली.
या स्पर्धेतील विजेते असे, प्रथम: – हायटेक स्प्रेअर, (एम. जे. शहा विद्यालय, बाहुबली), व्दितीय: मल्टीपर्पज अॅग्रीकल्चर टूल (महात्मा गांधी विद्यालय उंम्रज-), तृतीय: चना स्प्रुनिंग मशिन (मगरवाडा हायस्कूल, मगरवाडा), चतुर्थ: स्मार्ट सोलर इरिगेशन (समाजभूषण हनुमंतराव साळुखे विद्यालय कलढोण), तर पाचवा क्रमांक अॅग्रीकल्चर रोबोट (के. बी. पी. कृषी विद्यालय देवापूर).
बिझनेस प्लॅन स्पर्धेतील विजेते
या उपक्रमात बिझनेस प्लॅन स्पर्धा घेण्यात आली यामध्ये विद्यार्थ्यांनी नाविन्यपूर्ण बिझनेस प्लॅन सादर केले. यात जीवामृत तयार करणे, कोरफ़ड शेती, देशी गोपालन, लीमोग्रास तेल उत्पादन, सेंद्रिय भाज्या उत्पादन आणि विपणन, इंटीग्रेटेड फार्मिंग सिस्टीम, एकीकृत शेती प्रणाली, बनाना बर्फी, ईमू फार्मिंग, एकीकृत शेळी आणि कुक्कुटपालन, सेंद्रीय कंपोस्ट खत निर्मिति, वर्मी कंपोस्ट, टरबूजपासून कॅण्डी बनविणे यासह वेगवेगळे बिझनेस प्लॅन सादर केले. या स्पर्धेतील विजेते असे प्रथम: -भाजीपाला सूप, (सोमेश्वर विद्यालय अंजनगांव पुणे), व्दितीय: शेवगा पावडर (विठ्ठल माध्यमिक विद्यालय भिकोबानगर पुणे), तृतीय: कडकनाथ पोल्ट्री फार्म(जिजामाता हायस्कूल नागपूर), चतुर्थ: देशी गाय पाल (देशी कॅटल रेअरिंग) (कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय नेरळे सांगली) तर पाचवा क्रमांक केळी बर्फी ( एस. एस. पाटील विद्या मंदीर चहार्डी जि. जळगाव).

Leave A Reply

Your email address will not be published.