शेतकऱ्याला रानडुकराचा चावा ; शेतकरी बालंबाल वाचला

0

शिदाड, ता.पाचोरा :  येथील शेतकरी आबा तुळशीराम पाटील हे स्वतःच्या शेतात काम करीत असताना अचानक बामनी नदीतून धावत येऊन रानडुकराने त्यांच्यावर झडप घातली. रानडुकराने शेतकऱ्याच्या  गुडघ्याच्या वर मांडीवर जोरदार चावा घेत  शेतकरी जमिनीवर कोसळताच सुदैवाने डुकराने तिथून पळ काढला अन्यथा अनर्थ घडला. असता.

नेहमीप्रमाणे शेतकरी आबा पाटील आपल्या शेतात काम करत असताना सकाळी नांगरलेल्या शेतातील दगड-गोटे नदीकाठाला फेकत होते शेता शेजारी बामणी नदी असून याच नदीत झाडाझुडपात रान डुक्कर बसलेले असावे दगड गोटे फेकण्याचा आवाज होताच रानडुकराने नदीतून वर चढून शेतकरी पाटील यांच्या वर्धक घातली आणि गुडघ्याच्या वर मांडला जोरदार चावा घेतला चावा घेताच शेतकरी जमिनीवर कोसळला यावेळी डुक्कर  तसेच दुसऱ्याच्या शेतात निघून गेले शेतकऱ्यांचा नशीब बलवत्तर म्हणून शेतकरी बालंबाल वाचला सदर शेतकर्याने पाचोरा सरकारी दवाखान्यात जाऊन उपचार घेतले यावेळी वन विभागाचे कर्मचारी सुनील भिलावे उपस्थित होते. यावेळी शेतकऱ्याने आर्थिक मदतीचीही मागणी केली आहे.

रानडुकराच्या भीतीने परिसरातील शेतकरी भयभीत झाले असून, वन मविभागाने सदर रानडुकरला पकडावे. अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. सध्या शेतात मान्सून पूर्व शेतीच्या कामांना वेग आला असून, तसेच महाभयंकर कोरोना आजारापासून बचाव व्हावा, म्हणून शेतकरी आपल्या मुलाबाळांसह शेतात मशागतीचे काम करताना दिसतोय. मात्र शेतातही भीतीचे वातावरण शेतकऱ्यांसमोर आहेत. वनविभागाने याची दखल घ्यावी. अशी रास्त मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.