शेतकऱ्याची विष प्राशन करून आत्महत्या

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

जळगाव तालुक्यातील विटनेर येथील ४९ वर्षीय शेतकऱ्याने कर्जबाजारीपणामुळे विष घेवून आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे

मयत शेतकऱ्याचे नाव शेतकरी गोकुळ पांडुरंग वराडे (वय ४९ रा. विटनेर ता.जि.जळगाव) असे आहे. गोकुळ वराडे मकर संक्रातीला शेतात फवारणीसाठी गेले होते. यादरम्यान त्यांनी विषारी द्रव्य सेवन केले होते. हा प्रकार लक्षात आल्यानंतर कुटूंबाने त्यांना उपचारासाठी शासकीय वैद्यकिय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले होते. उपचार सुरू असताना रविवारी रात्री ११ वाजता त्यांची प्राणज्योत मालवली.

गोकुळ वराडे यांनी जळके स्टेट बँक शाखेतून शेतासाठी कर्ज घेतले आहे. त्यांच्याकडे स्वतः च्या मालकीचे विटनेर शिवारात एकूण ८० आर जमीनीचे क्षेत्र आहे. कर्जाच्या नैराश्यातून आत्महत्या केल्याचे सांगितले जात आहे. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस प्रदिप पाटील करीत आहेत.

 

Leave A Reply

Your email address will not be published.