शेतकऱ्यांना तात्काळ मदत मिळावी यासाठी शिवसेना,युवासेनातर्फे रास्ता रोको आंदोलन

0

भडगाव (प्रतिनिधी) : तालुक्यातील शंभर टक्के शेतकरी या दोन महिन्यात झालेल्या अतिवृष्टी च्या पावसामुळे बाधित झाले असून त्यांच्या शेतातील पिकांचे संपूर्ण नुकसान झालेले आहे.  याबाबत शासनाचे आदेशाने प्रशासनाने नुकसानीचे पंचनामे केले असून तसा अहवाल शासनाकडे सादर केलेला आहे विद्यमान परिस्थितीत राज्यात राष्ट्रपती शासन असल्यामुळे याबाबतचा निर्णय घेण्याची संपूर्ण अधिकारी माननीय राज्यपाल साहेब यांना आहेत.  वरील परिस्थिती असताना शेतकऱ्यांना अद्यापपर्यंत नुकसानीची रक्कम न मिळाल्यामुळे शेतकरी अस्वस्थ असून त्याची मनस्थिती आत्महत्या कडे चुकत आहे माननीय राज्यपाल महोदयांनी 8000 रु मदत देऊ केली आहे. ती अत्यंत तुटपुंजी आहे म्हणून शासनाने तथा माननीय राज्यपाल साहेब यांनी शेतकऱ्यांना तातडीने सरसकट हेक्टरी 50 हजार रुपये मदत जमा करावी या मागणीसाठी आम्ही शिवसेना व युवासेना तर्फे दिनांक 20  बुधवार रोजी सकाळी 11 वाजता चाळीसगाव चौफुली भडगाव येथे रास्ता रोको आंदोलन करणार आहोत तरी याबाबत आपण नोंद घ्यावी शेतकऱ्यां चे प्रतिनिधी म्हणून आमच्या भावना माननीय राज्यपाल साहेब यांच्या पर्यंत पोहोचवाव्यात यासाठी असे निवेदनात नमूद करण्यात आले असून तहसीलदार भडगाव यांच्याकडे निवेदन देण्यात आले निवेदनावर शिवसेना शहर प्रमुख मनोहर चौधरी यांची सही आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.